fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRA

मोबाईलवरील व्हिडिओ  प्रमाणे करण्याचा ‘तो’ हट्ट करायचा; विवाहितेने दिली पोलिसात तक्रार

सोलापूर : ‘नवीन घर घेण्यासाठी माहेरवरून नऊ लाख रूपये घेऊन ये’ असे म्हणून २३ वर्षाच्या विवाहीतले लाथाबुक्यांनी मारहाण करून शारीरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू, दोन नणंद व मामाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित विवाहितेने जेऊर येथे याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 

विवाहित ही पुणे जिल्ह्यातील  निरा येथील राहणारी आहे. हल्ली ती  जेऊरमध्ये राहत आहे. फिर्यादी विवाहितेचा पती निरा येथील एका कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्यांचे लग्न झाल्यानंतर 15 दिवस व्यवस्थित नांदविले. त्यानंतर पती व सासू यांनी घरातील कामकाजावरून किरकोळ कारणा घालून पाडून बोलणे व तुझ्या आई- वडीलांनी लग्नामध्ये पाहुणचार केला नाही. सोने कमी दिले. घरातील संसारपयोगी वस्तू संपुर्ण दिलेल्या नाहीत. यावरून त्रास देण्यास सुरुवात केली.

विवाहित पीडितेला ‘तु या घरात राहायचे नाही, हे घर माझे आहे’ असे म्हणून पती व मामांकडून धमकी दिली जात होती. ‘तुझ्या आई- वडीलाकडून माझा भाचा (पती) व बहीणीला (सासू) समोरचा फ्लॅट  खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये’ असे म्हणून वारंवार त्रास दिली जात होता.

दरम्यान  शिर्डीमधील व नाशिक येथील नणंद निरा येथील घरी आल्यानंतर विवाहितेला म्हणायच्या की, ‘तु मोकळ्या हाताने आमच्या घरी आलेली आहे. तु तुझ्या आई- बापाकडून लग्नामध्ये काहीएक चिज वस्तू आणलेल्या नाही. आमच्या भावाला नवीन घर घ्यायचे आहे. त्यासाठी तु आई वडीलांकडून नऊ लाख रुपये घेऊन ये असे म्हणून शिवीगाळ करून धमकी देत. पती व सासूला या दोन्ही नणंद या माझेशी व्यवस्थित वागयचे नाही असे शिकवण देत असत. तसेच पती मोबाईलवरील अश्लिल व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे तो शरीरसंबंध करण्याचा हट्ट करीत असे. त्यास विरोध केल्यास त्याकारणावरून तो शिवीगाळ करून मारहाण करून मला वारंवार त्रास देत होता, असेही या फिर्यादीत म्हटले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading