fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

एचडीएफसी म्युच्युअल फंडातर्फे नवीन मल्टी कॅप फंड जाहीर

पुणे : भारतातील आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक आणि ४. ४८ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तांचे व्यवस्थापन  करणाऱ्या एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने एचडीएफसी मल्टी कॅप फंड’ ( HDFC Mutual Fund) सादर केला आहे. आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप व स्मॉल कॅप या क्षेत्रांतील कंपन्यांचा शिस्तबद्ध पद्धतीने समावेश करून तो वैविध्यपूर्ण बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी हा एचडीएफसी मल्टी कॅप फंड आणण्यात आला आहे. या फंड योजनेत लार्ज कॅप, मिड कॅप व स्मॉल कॅप अशा कंपन्यांचा प्रत्येकी २५ टक्के वाटा अनिवार्यपणे असणार आहे आणि उर्वरीत २५ टक्के वाटा हा फंड व्यवस्थापकाच्या बाजारपेठीय दृष्टिकोनावर अवलंबून असणार आहे. वेगवेगळ्या मार्केट कॅपिटलायझेशनमधील विविध क्षेत्रांतील कंपन्यांचे विस्तृत प्रतिनिधीत्व या फंड योजनेमध्ये आहे. हा एनएफओ येत्या दि. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी खुला होईल व दि. ७डिसेंबर २०२१ रोजी बंद होईल.

गेल्या १६ आर्थिक वर्षांमध्ये  लार्ज कॅप्स हा ६ वर्षे अव्वल कामगिरी करणारा विभाग ठरला आहे, तसेच मिड कॅप विभागाने अव्वल कामगिरी ३ वर्षे केली असून स्मॉल कॅप विभागाने ७ वर्षे केली आहे. म्हणूनचवेगवेगळे मार्केट कॅप विभाग एकत्र आणण्याचे धोरण योग्य ठरते. अर्थात, लार्जमिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे अलोकेशन ठरवणे हे बहुसंख्य गुंतवणूकदारांना सोपे नसते. हे काम एचडीएफसी मल्टी कॅप फंड करतो. या एका फंडाद्वारे लार्ज कॅपची स्थिरतामिड कॅप्सची वाढ आणि स्मॉल कॅपची क्षमता या गोष्टी प्राप्त करण्याचा उद्देश साध्य करता येतो आणि त्यामुळेच विविध मार्केट कॅप विभागांच्या माध्यमातून पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तो वन-स्टॉप सोल्यूशन देऊ शकतो. मल्टी कॅपचे हे धोरण गुंतवणूकदारांना विविध मार्केट कॅप विभागांच्या कमी-जास्त कामगिरीचा अंदाज लावण्याऐवजी विविधतेवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.

गुंतवणुकीच्या रणनीतीच्या दृष्टीने, ‘एचडीएफसी मल्टी कॅप फंडमध्ये स्टॉक निवडीसाठी टॉप-डाउन आणि बॉटम-अप पद्धतीचे मिश्रण करण्यात येईल. सध्याच्या गुंतवणुकीच्या धोरणानुसारही योजना एकूण मालमत्तेच्या सुमारे ६० ते ७५ टक्के मालमत्ता लार्ज व मिड कॅप क्षेत्रात गुंतवणार आहे आणि २५ ते ४० टक्के मालमत्ता स्मॉल कॅपमध्ये गुंतवणार आहे. कोणत्याही विशिष्ट शैलीचा अवलंब न करता यात गुंतवणूक करण्यात येणार आहे. वाढमूल्य आणि टर्नअराउंड कंपन्यांमधील संधी प्राप्त करण्याचा या फंडाचा उद्देश आहे.

एचडीएफसी मल्टी कॅपचे व्यवस्थापक गोपाल अग्रवाल म्हणाले की वेगवेगळ्या मार्केट कॅप विभागांची वेगवेगळ्या कालखंडांमध्ये वेगवेगळी कामगिरी होत असते, हे आपण नेहमीच पाहतो. वेगवेगळ्या मार्केट कॅपमध्ये एकाच फंडाच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करून जोखीम-समायोजित परतावा उत्तम प्रमाणात मिळविण्याची इच्छा असणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी एचडीएफसी मल्टी कॅप फंड हे वन-स्टॉप सोल्यूशन आहे. सतत बदलत राहणाऱ्या परिस्थितीत, प्रभावी वैविध्य आणि स्टॉक्सची निवड या बाबी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. भारताच्या प्रगतीच्या वाटचालीत रचनात्मक वाढीला चालना देणारे घटक व सहाय्यभूत स्वरुपाचे बाह्य वातावरण यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे, उत्पन्नवाढीचे नियोजन आणि अनुकूल असे स्थूल अर्थशास्त्रीय वातावरण यांचा इक्विटीवर मध्यम ते दीर्घ कालावधीत सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येते.

लार्ज, मिड व स्मॉल कॅप या विभागांत शिस्तबद्ध गुंतवणूक करण्यास आणि मध्यम ते दीर्घ कालखंडाचा विचार करण्यास तयार असलेल्या गुंतवणुकदारांसाठी एचडीएफसी मल्टी कॅप फंड अगदी योग्य ठरतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading