fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अंनतात विलीन

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे वृद्धापधापकाळाने निधन झाले. आज पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. नुकतेच त्यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केले होते. आज सकाळी त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे दर्शन घेण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टीळक, उपमहापौर सुनीता वाडेकर, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सुनील महाजन, अभिनेत्रे राहुल कोल्हापूरकर, पुणे महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगसेवक व पुणे विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या दुःखद निधनामुळे जगभरातुन शोक वक्त्य होत आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आम्हाला खूप दुख झाले आहे.त्यांनी आम्हा सगळयांना शिवाजी महाराजानी केलेल्या कामाचे महत्व सांगितले आहे.”

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने आम्हाला एक खूप मोठा धक्का बसला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रासाठी आयुष्य वेचले.  तरुण पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा”.

खासदार गिरीश बापट म्हणाले, “बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे. त्याची पोकळीक ही कधीच भरून निघणार नाही.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading