fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी राज्य सरकारची समिती निर्णय घेईल- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

पुणे : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले असून बस स्थानकाबाहेर राज्य सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. जवळपास 35 कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. तर कित्येक एसटी कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. एसटी बंद असल्यामुळे सामान्य जनतेचे भरपूर हाल होत आहेत. आता एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी राज्य सरकारची समिती निर्णय घेईल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

महसूल व वन विभागांतर्गत आयोजित ‘महसूल परिषद 2021’विषयी माहिती देण्यासाठी आयोजित  पत्रकार परिषद ते आज बोलत होते. बाळासाहेब थोरात म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकार लवकरच सोडवणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब थोड्याच दिवसात याबद्दल निर्णय घेतील असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी महसूल परिषदेत घडलेल्या चर्चा विषयी माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनामुळे दोन वर्षानंतर महसूल परीषद पार पडली. कोरोना संकटात महसूल विभागाने मोठे काम केल आहे. महसूल विभाग आणि वाळू असे समीकरण झालय. वाळू संदर्भात नवा GR लवकरच सादर करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जुन्या सातबारा मुळे शेतकऱ्यांना नवीन सातबारा करायला खूप वेळ लागायचा त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले पूर्वीच्या अनावश्यक नोंदी काढून नवीन सातबारा तयार केला आहे.सर्व शेतकऱ्यांना घरपोच सातबारा पोहोचवणार.सहजतेनं बिनचूक 7/12 8अ उपलब्ध करणं हे महसूल विभागाचं ध्येय आहे, असे थोरात म्हणाले.

थोरात यांनी ई पीक पाहणी बद्दल पण भाष्य केले. ई पीक पाहणी अभियान लवकर देशभर सुरू होईल ई पीक पाहणी स्मार्टफोन द्वारे शेतकऱ्यांना करता येणार त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची माहिती स्मार्टफोन वर लगेच कळणार आहे. ई पीक पाहणी स्मार्टफोन द्वारे शेतकऱ्यांना करता येणार आहे, असे थोरात म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading