fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

सूक्ष्मजीवरोधक एअर प्युरिफायर्स निर्माता ‘ऐर्थ’च्या मूल्यांकनात वाढ

मुंबई : सूक्ष्मजीवरोधक एअर प्युरिफायर्सचे उत्पादन करणारी जगातील पहिली आणि एकमेव कंपनी ऐर्थने (AiRTH) व्हाइटबोर्ड कॅपिटल, सिरमा टेक्नॉलॉजी आणि फर्स्टकडून यशस्वीरीत्या प्राथमिक भांडवल निधी उभारला आहे. भारतभरातून असलेल्या प्रचंड मागणीची पूर्तता करण्याच्या उद्देशाने उत्पादन क्षमतेत वाढ आणि विक्री पश्चात सेवेच्या आधुनिकीकरणासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. या माध्यमातून ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ऐर्थचे संस्थापक आणि सीईओ रवी कौशिक म्हणाले की, आमचा प्रवास सुरू होऊन जेमतेव वर्षभरच झाले आहे. या अल्प कालावधीत आम्ही ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशेन (ओएनजीसी), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), रुग्णालये आणि इतर प्रभावशाली ग्राहकांचे सेवा प्रदाते बनलो आहोत. त्यांनी आमची उत्पादने आणि कंपनीच्या दूरदृष्टीवर विश्वास टाकला आहे. आमचे प्युरिफायर हवेतील कोविड-१९ स्ट्रेन्सचा मुकाबला करण्यासह इतर हानिकारक जंतू आणि विषाणूंना निष्क्रिय करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. वाढते प्रदूषण आणि प्राणघातक वायूजन्य आजारांच्या आजच्या काळात आमचे प्युरिफायर अत्यंत फायदेशीर आहे. आज जास्तीत जास्त लोकांना आमचे महत्त्व कळाले आहे.म्हणूनच एक निरोगी इनडोअर वातावरणाची निर्मिती करता यावी यासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. या ताज्या निधी पोषणामुळे ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या हेतून आम्हाला आमची कार्यक्षमता वाढवण्यात मदत मिळणार आहे.”

रवी कौशिक यांच्या कल्पनेतून जून २०२० मध्ये ऐर्थची स्थापना करण्यात आली. हवेतील अदृश्य विषाणू आणि जंतूचा घातक प्रभाव निष्प्रभ करण्याचा हेतू या मागे होता. जगातील पहिले सूक्ष्मजीवरोधक एअर प्युरिफायर हे कंपनीचे प्रमुख उत्पादन आहे. ते एकमेकाद्वितीय डीसीडी (डीअॅक्टिव्हेट-कॅप्चर-डिअॅक्टिव्हेट) तंत्रावर काम करते. या माध्यमातून आपल्या भोवताली असलेले अदृश्य विषाणू आणि जंतू तत्क्षणी निष्प्रभ करण्यात येतात. इतर एअर प्युरिफायर हे पकडलेल्या जंतूंसाठी पोषक प्रजनन स्थळाचा स्रोत ठरतात. त्या उलट ऐर्थचे सूक्ष्मजीवरोधक एअर प्युरिफायर सर्वांगीण सुरक्षा पुरवते. त्याचे तंत्रज्ञान हे सार्स-कोव्ह-२ आकाराचे सूक्ष्मकणही ( १०० एनएम आकाराचे) वगळण्यासाठी सक्षम असल्याचे सीएसआयआर-एनपीएलमध्ये (राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा) घेतलेल्या चाचण्यांत सिद्ध झाले आहे. फिक्की रिसर्च अँड अॅनॅलिसिस सेंटरमध्ये अवघ्या १० मिनिटांत ऐर्थ ने ९९.९९% जंतू निष्क्रिय केल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच टीयूव्ही ऱ्हाइनलँड येथील उपकरणांत पकडलेल्या जंतूंचे निष्क्रियीकरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading