fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsSports

राष्ट्रीय ज्युनियर वुशू स्पर्धेत पुण्याच्या स्वराज कोकाटेला 3 सुवर्ण

पुणे : लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब येथे झालेल्या २० व्या राष्ट्रीय ज्युनियर वुशू मुले-मुली अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुण्याच्या स्वराज कोकाटे याने ताऊलू प्रकारांमध्ये तीन सुवर्ण पदकांची तर सलोनी जाधव हिने एक सुवर्ण पदक पटकाविले. महाराष्ट्र संघाने सान्सू व ताऊलू प्रकारांमध्ये एकूण ४ सुवर्ण, २ रौप्य आणि ७ कांस्य पदकांची  कमाई केली. स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने ३ रे स्थान पटकाविले.

ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस. झेंडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केल।  भारतीय वुशू संघटनेचे सहसचिव व महाराष्ट्र वुशू संघटनेचे सचिव सोपान कटके यांचे खेळाडूंना मार्गदर्शन मिळाले. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रवीण कुचगावे तर संघ व्यवस्थापक म्हणून आप्पासाहेब तांबे, संजय शिंदे यांनी काम पाहिले. या स्पर्धेमध्ये एकूण बत्तीस संघांचा सहभाग होता व अकराशे पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग होता.

स्पर्धेमध्ये सलोनी जाधव हिने एक सुवर्णपदकासह एक रौप्य, स्वयम् कटके याने कांस्य पदक, ओमकार मोडक कांस्यपदक, सिद्धी शिंदे कांस्यपदक तर सान्सू फाईट प्रकारांमध्ये भाग्यश्री पोहनकर हिने रौप्य सोनाली जाधव हिने कांस्यपदक, विनायक शिंदे कांस्यपदक, सुरज राजभार  कांस्यपदक व आकाश सिंह याने देखील कांस्यपदकाची कमाई केली.

निकाल पुढीलप्रमाणे –
१.स्वराज कोकाटे -गोल्ड – ननक्वान  3रा सेट.(पुणे)
२.स्वराज कोकाटे- गोल्ड -नंदाव- तिसरा सेट.(पुणे)
३.स्वराज कोकाटे-गोल्ड नंनगुण तिसरा सेट.(पुणे)
४.सलोनी जाधव -गोल्ड -ननक्वान 3रा सेट.(पुणे)
५.सलोनी जाधव- रौप्य – नंदाव-तिसरा सेट.(पुणे)
६.स्वयम कटके- कांस्य गुन्शू 3रा संच.(पुणे)
७.ओंकार मोडक-कांस्य -तायचीजेन तिसरा सेट.(पुणे)
८.सिद्धी शिंदे- कांस्य –  तायचीजेन. (पुणे)*भाग्यश्री पोहनकर – रौप्य – नागपूर , सोनली जाधव – कांस्य – सांगली, सुरज राजभार –कांस्य – कांस्यपदक, विनायक शिंदे – कांस्यपदक- रायगड, आकाश सिंग –  मुंबई सब

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading