fbpx
Saturday, April 20, 2024
BusinessLatest News

कॅननची स्थिर व्यवसाय वाढ

पुणे : कॅनन इंडियाने वर्ष २०२१ मध्ये  स्थिर व्यवसाय वाढ  नोंदवली आहे. कंपनीच्या  विविध प्रकारच्या उत्पादन विभागांतील विक्रीमध्ये झालेल्या वाढीच्या मदतीने  कॅननने  कोविड महामारी पूर्वच्या व्यवसायची पातळी गाठली आहे.  नाविन्यपूर्ण उत्पादने व नवीन धोरणाची जोड देत कंपनीने कॅमेरा आणि प्रिंटिंग व्यवसायात वाढ नोंदवली आहे.

या व्यावसायिकवाढीबद्दल कॅनन इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मानाबु यामाजाकी म्हणाले की गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करत असताना आम्हाला समांतरपणे व्यवसाय विस्तार करण्याच्या भरपूर संधी दिसून येत आहे. फोटो प्रिंटिंग पद्धतीमुळे घरी वापरण्याच्या प्रिंटर विभागात लक्षणीय बदल व पर्यायाने व्यावसायिक विकास दिसून आला असून त्या अनुषंगाने आम्ही २०२१ मध्ये विविध नवी मॉडेल्स आणत आहोत.

मानाबु यामाजाकी पुढे म्हणाले की, ऑनलाईन वर्गामुळे शिक्षकांकडून प्रो डीव्ही कॅमेरा मॉडेल्ससाठी चांगली मागणी दिसून येत आहे. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म हीच नवी सिनेमाघरे झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांत आम्हाला सिनेमा कॅमेऱ्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

कामाच्या हायब्रीड संस्कृतीमुळे ब्रँडच्या ऑफिस ऑटोमेशन व्यवसायात वाढ झाली आहे. कॅनन इंडियाने सलग पाच वर्ष A3 आणि A4 लेसर कॉपीयर क्षेत्रातील बाजारपेठेत सर्वाधिक हिस्सा मिळवत आपली आघाडी दर्शवून दिली आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सर्व्हिस सपोर्टमुळे हे यश शक्य झाले आहे. कागदपत्रांचे व्यवस्थापन आणि स्वयंचलित प्रक्रिया उत्पादने हायब्रीड वर्कप्लेसमधील डिजिटल धोरणाचा गाभा आहेत. परिणामी, ‘‘देअरफोर ऑनलाइन’सारख्या क्लाऊड आधारित डॉक्युमेंट मॅनेजमेंट उत्पादनामुळे ग्राहकांना कुठेही असताना माहिती मिळवणे, ती सुरक्षित ठेवणे, तिचे व्यवस्थापन करणे, वापरणे, विश्लेषण करणे आणि स्वयंचलन करणे शक्य करणाऱ्या क्लाउड- बेस्ड डॉक्युमेंट मॅनेजमेंट उत्पादनांना मागणी वाढत असल्याचे मत कॅनन इंडियाने व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading