fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

… आणि निनादली तिसरी घंटा !!!

पुणेः कोविडमुळे गेली दोन वर्ष सर्व रंगभूमी कलाकार वेठीस धरले गेले होते. हा कठीण काळ विसरण्यासाठी, सर्व नाट्यगृह खुले करण्याच्या राज्य सरकारच्या सकारात्मक निर्णयाचे आणि आगामी उज्जवल भविष्याचे स्वागत करण्यासाठी ” आम्ही एकपात्री, महाराष्ट्र ” या संस्थेच्यावतीने नाट्यगृहात वाजणा-या तिस-या घंटेचा नाद प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला. तिसरी घंटा निनानदताच उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला.

आम्ही एकपात्री, महाराष्ट्रतर्फे आज ‘घंटानाद, निषेधाचा नव्हे कृतज्ञेचा !!’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन एस. एम. जोशी सभागृहाच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले होते. सिने नाटय सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विजय पटवर्धन, वृषाली पटवर्धन, तसेच आम्ही एकपात्री, महाराष्ट्रचे विश्वस्त वंदन राम नगरकर, महेंद्र गणपुले आणि अनुपमा खरे यांच्यासह अन्य कलाकारांनी यावेळी उपस्थित राहून एकमुखाने, एकदिलाने ह्यात सहभागी होऊन घंटानाद केला. यानंतर एस. एम. जोशी सभागृहाच्या छोट्या हॉलमध्ये “रंग नवरात्रीचे’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये आम्ही एकपात्रीच्या नऊ महिला कलाकारांनी गाणी, एकपात्री अभिनय आणि नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading