fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

शरद पवार नेहमी आम्हाला सांगतात की तरूणांना संधी द्या-नवाब मलिक

पुणे: निवडणूक लढवण्याची ईच्छा ठेवणं गैर नाही.नंतर चुरस निर्माण होते.मात्र दिलेला उमेदवार निवडून आणणं हे आपलं काम आहे.तीन पक्षाचं सरकार आहे आपल्याला संधी कमी आहे. भाजपला पुन्हा एकदा हरवण्याची जबाबदारी आपली आहे.  शरद पवार नेहमी आम्हाला सांगतात की तरूणांना संधी द्या. असे अल्पसंख्यांक विकास व कौशल्य रोजगार मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते  नवाब मलिक यांनी आज पुण्यात सांगितले. 

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या कोंढवा भागातील पदाधिकाऱ्यां बरोबर बैठकीचे आयोजन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते .या वेळी  पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप शेख ,यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीस राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,नगरसेवक हाजी गफुर पठाण  ,अब्दुल ईनामदार,नगरसेविका नंदा लोणकर, आमदार चेतन तुपे व राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी व  उपस्थित होते.
नवाब मलिक म्हणाले,2019 – 20 सालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुण्यात चांगल काम करतोय. आज देशात भाजपचं सरकार आहे.दोन वर्षांपूर्वी पवारांनी तीन पक्षाचं सरकार बनवलं.आणि भाजपचं सरकार घालवल यांची त्यांनी आठवण करून दिली.  कोव्हीडचा काळ कमी झालाय आता लोकांमध्ये गेलं पाहिजे.चार महिन्यांवर निवडणूका आहेत .एका महिन्यात सगळ्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी मिळतील. असे आश्वासन त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.31 डिसेंबर पर्यंत मतदारयाद्या तयार करा. याद्या प्रत्येक बुथपर्यंत पोहोचवा.असे आदेश नवाब मलिक पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading