fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलली! मनस्तापाबद्दल माफी मागतो, आरोग्य मंत्री

मुंबई : आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय. या बातमीनंतर विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा या परजिल्ह्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. तर काही विद्यार्थी अजूनही प्रवासात आहेत. शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करतायत. तर दुसरीकडे परीक्षा केंद्राबाबत झालेल्या घोळमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा झालेला निर्णय योग्यच असल्याचे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केलय. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री.राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात उद्या आणि परवा आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा राज्यात होत असताना काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र ही इतर राज्यांतील आली आहेत. एका विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आलं आहे. त्यामुळे उद्याच्या परीक्षेबाबत परीक्षार्थींमध्ये एकच गोंधळ उडाला होता. ही समस्या केवळ एकाच विद्यार्थ्याला आली असून त्याचे हॉल तिकीट तात्काळ दुरुस्त केलं आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते. कुठल्याही परिक्षार्थींची गौरसोय होणार नाही अशा प्रकारे नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आज परीक्षा केंद्रांवर पाहणी करून कुठल्याही परीक्षार्थींची गैरसोय होऊ देणार नसल्याचं सांगितलं होतं. परभणीतील रावसाहेब जामकर महिला महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्राची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह पाहणी केली आहे आणि व्यवस्थेचा आढावा घेतला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading