fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आण्णासाहेब पाटील जयंती साजरी 

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ संस्थापक -अध्यक्ष, माथाडी कामगार चे दैवत, मराठा क्रांतीसुर्य, मा .आमदार कै. अण्णासाहेब पाटील यांच्या ८८व्या जयंती निमित्त पुणे शहर मध्यवर्ती  कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी राजेंद्र कोंढरे यांनी आण्णासाहेब पाटील यांनी जिवनात केलेला संघर्ष सांगितला व शहर युवक अध्यक्ष युवराज दिसले यांनी त्यांचे  कार्य सांगुन आदरांजली अपर्ण केली.  या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्रजी कोंढरे सर ,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस नामदेवजी मानकर पुणे शहराध्यक्ष गुलाबदादा गायकवाड, पुणे शहर युवक अध्यक्ष युवराज दिसले, शहर महिला अध्यक्ष श्रुतिका ताई पाडाळे, व्यावसायिक आघाडी अध्यक्ष प शहर पै दत्तात्रय भिसे, पुणे शहर सरचिटणीस गणेशजी मापारी, शहर  युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड, पुणे शहर युवक उपाध्यक्ष सुनिल पवार , तुषार पवार,सुनील हाळंदे शहर संघटक, पुणे शहर युवक संघटक प्रवीण गोगावले ,व निलेश सांगळे, दीपक देशमुख , अभिषेक आहेर, नामदेव तोंडे, दिपक देशमुख व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading