fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest NewsTECHNOLOGY

कर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ अॅप लॉन्च

मुंबई : फिनटेक सास कंपनी क्लिअर (क्लिअरटॅक्सच्या निर्मात्यांकडून) ने क्लिअर प्रो हे अॅप लॉन्च केले आहे. क्लिअर प्रो हे पाहिलेवहिले मोबाइल अॅप आहे, जे कर व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करेल. क्लिअर टॅक्स प्रोच्या कम्युनिकेशन फीचरच्या मतडीने कर व्यावसायिक एकाच क्लिकमध्ये आपल्या सर्व क्लायन्ट्सना टॅक्स फाइल करण्यासाठी आवश्यक माहिती देण्याबाबतचे रिमाइंडर पाठवू शकतात. ते कर व्यावसायिकांना सर्व क्लायन्ट्सना एकाच क्लिकने ईमेल्स पाठवण्यास आणि (१-२) व्हॉट्सअॅप कम्युनिकेशन सुरू करण्यास सक्षम करते.

क्लायन्ट्सशी कम्युनिकेट करण्याव्यतिरिक्त, हे अॅप जीएसटी  फायलिंग स्थिती तपासण्यास आणि चलन तयार करण्यास, ते ट्रॅक करण्यास आणि शेअर करण्यास आणि हे सर्व अनेक क्लायन्ट्ससाठी एकत्रितपणे एकाच झटक्यात करण्यास कर व्यावसायिकाला सक्षम करते. हे अॅप एका इंटेलिजंट रेकमेंडेशन मॉडेल मार्फत आपल्या क्लायन्टसाठी पैसे वाचविण्यास कर व्यावसायिकास मदत करते. हे मॉडेल चलन तयार करण्याच्या योग्य मार्ग सुचवतो. चलन बनवताना, अॅप तुम्हाला सांगते की, निवडलेला चलन बनवण्याचा पर्याय सक्षम आहे की नाही. जर ती इष्ट पद्धत नसेल, तर इतर पर्याय निवडून किती पैसे वाचवता येतील हे अॅप दाखवते.

क्लिअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले, “क्लिअर प्रो हे पहिलेच अॅप आहे, जे विशेषतः कर तज्ज्ञांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. त्याचा उद्देश क्लायन्ट्सशी कम्युनिकेशन, समन्वय आणि सहकार साधून वेळेवर अनुपालन सुनिश्चित करणे हा आहे.”

क्लिअर प्रो ‘न्यूज अॅट ए ग्लान्स’ आणि ‘कम्प्लायन्स कॅलेंडर’ सारख्या फीचर्स देखील ऑफर करते. कर व्यावसायिक जीएसटी, आयटीआर आणि आरओसीसाठी फायलिंगच्या अंतिम तारखा आणि वाढवून दिलेल्या तारखा थेट अॅप कॅलेंडरवरून ट्रॅक करू शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading