fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

इंडियन ऑईलने पुण्याच्या पहिल्या मॉडेल रिटेल आउटलेटच्या उद्घाटनाने अमृत महोत्सवाची सुरुवात केली

पुणे : आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाची सुरुवात म्हणून इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक आणि राज्य प्रमुख,महाराष्ट्र, अनिर्बन घोष यांनी मे. त्रिशूल सर्व्हिस स्टेशन प्रायव्हेट लिमिटेड,एमआयडीसी भोसरी,पुणे या पहिल्या मॉडेल रिटेल आउटलेटच्या उद्घाटनाची घोषणा केली.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त 12 मार्च 2021 रोजी आझादी का अमृत महोत्सवाची सुरुवात केली होती.इंडियन ऑईल आपल्या इंधन केंद्रांवर ग्राहक सेवा वाढवण्यासाठी देशभरात अमृत महोत्सव साजरा करत आहे.

अनिर्बन घोष यांनी आपल्या उद्घाटन भाषणात सांगितले की मॉडेल रिटेल आउटलेट (आरओ) म्हणून मे. त्रिशूल सर्व्हिस स्टेशन ग्राहकांना पेट्रोल, डिझेल, एक्सपी 95 प्रीमियम पेट्रोल, इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन, सर्वो ल्यूब ऑइल, अडॉन, क्लिअर ब्लू (डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड) आणि 5 किलो छोटू एलपीजी सिलेंडर सारख्या उत्पादनांसह संपूर्ण इंधन श्रेणी उपलब्ध करविते आहे.

इंडियन ऑईलने त्याच्या रिटेल आउटलेटमध्ये “प्योर और पूरा दोनों ही” चे आश्वासन पाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेतला आहे. इंडियन ऑईलने देशभरात आजपर्यंत सुमारे 30,000 रिटेल आउटलेटवर रिटेल ऑटोमेशन प्रणाली लागू केली आहे. पुणे शहरात सर्व इंडियन ऑईल रिटेल आउटलेट पूर्णपणे स्वयंचलित आहेत. रिटेल ऑटोमेशन म्हणजे रिटेल आउटलेटच्या सर्व ऑपरेशन्स आणि व्यवसाय प्रक्रियेचे ऑटोमेशन. सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कॅप्चर, कोलेट आणि ऍनलाईज करून हे साध्य केले जाते. रिटेल आउटलेटशी संबंधित फोरकोर्ट, सेल्स रूम (आउटलेटवर) आणि आयओसी स्टेट ऑफिस (ऑपरेशन आणि बिझनेस) व्यवहार अखंडपणे व्यवस्थापित करण्यात ही प्रणाली मदत करते. रिटेल ऑटोमेशनचा मुख्य उद्देश ग्राहक संबंध व्यवस्थापन आहे. मॅन्युअल हस्तक्षेप काढून टाकला जातो आणि व्यवहार आणि ऑपरेशन्सचा वेग वाढवला जातो. यामुळे ब्रँड इंडियन ऑईलला त्याच्या ग्राहकांकडून  लाभणारा विश्वास अधिक बळकट होतो. हा विश्वास गुणवत्ता आणि प्रमाण यावर आधारित असतो.

अजय श्रीवास्तव, महाव्यवस्थापक (रिटेल सेल्स) महाराष्ट्र राज्य कार्यालय, नवनीत मेहता, विभागीय रिटेल सेल्स प्रमुख, पुणे विभागीय कार्यालय, इंडियन ऑईलचे अधिकारी, डीलर्स आणि ग्राहक, उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. रिटेल आउटलेट डीलर बाळप्पा जवल्गी चालवत आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading