fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे माजी शहराध्यक्ष विष्णू शेळके यांची असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपला सोडचिठ्ठी

पिंपरी : भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे माजी शहराध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख आणि पिंपरी चिंचवड शहरात आदिवासी समाजाचे संघटनात्मक जाळे निर्माण केलेले भाजपचे निष्ठावंत व आदिम यंग ग्लॅडीएटर्स संघटनेचे संस्थापक विष्णू शेळके यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेळके यांनी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी उपसभापती राजू लोखंडे, वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष विजूअण्णा जगताप आदी उपस्थित होते. विष्णू शेळके यांच्या सोबतच संघटनेचे उपप्रमुख देवराम चपटे, कार्याध्यक्ष प्रभाकर घोटकर, युवाध्यक्ष गिरीश गवारी, संपर्क प्रमुख राहुल बुरुड, सचिव गणेश कोकाटे, उपसचिव अक्षय कुटे यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
विष्णू शेळके यांनी माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अनेक मोर्चे, मेळावे, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे, प्रदर्शने, विधायक रचनात्मक कार्यक्रम, उपक्रम त्यांनी राबविले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात जवळपास 80 हजार आदिवासी समाज राहतो. यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी वर्गापासून सर्वसामान्य कामगार वर्गापर्यंत शेळके यांचा थेट संपर्क आहे.
आदिम यंग ग्लॅडीएटर्स महाराष्ट्र राज्य, आदिम महिला बचत गट महासंघ पुणे पिंपरी चिंचवड, आदिम न्यूज, आदिम प्रबोधन पथक, आदिम वधू वर सूचक केंद्र, शिवसह्याद्री वाद्य पथक, शिवाई महिला लेझीम पथक, भीमाशंकर महिला लेझीम पथक आदी संस्थांचे ते संस्थापक असून, या माध्यमातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे.  शेळके यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होण्यास मदत होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मताधिक्य मजबूत होण्यास यामुळे मदतच होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading