fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि ग्रॅव्हिटस फाउंडेशन द्वारे ट्रान्सजेंडर्ससाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम

पुणे :  सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ही महाराष्ट्रातील पहिली स्किल डेव्हलपमेंट युनिवर्सिटी आहे जी सर्व वयोगटातील आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील तरुणांना कौशल्याभिमुख शिक्षण देते, ही युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार सक्षम बनविण्याच्या उद्देशाने स्थापित केली गेली आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सिंबायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या कम्युनिटी कॉलेजमधून विविध अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत आणि आज ते स्वावलंबी बनले आहेत. ग्रॅव्हिटस फाउंडेशनचा असा विश्वास आहे की समाज्यास बळकट व सबल करण्यासाठी सकारात्मक सामाजिक बदल गरजेचे आहेत.

ग्रॅव्हिटस फाउंडेशन शिक्षणाच्या विविध शाखांमधील शिक्षण, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. आपल्या याच विचारांतुन आणि दृष्टीकोणातुन सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि ग्रॅव्हिटस फाउंडेशन ने मिळून ट्रान्सजेंडर समुदायाला कौशल्य आधारित कार्यक्रम (स्किल बेस प्रोग्रॅम) देण्याचा हा उपक्रम सुरू केला आहे. ट्रान्सजेंडर समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पात टेलरिंग, सॅनिटरी पॅड मेकिंग, ब्युटी सर्व्हिसेस, हर्बल प्रॉडक्ट्स इत्यादी सर्टिफिकेशन प्रोग्रॅमचा समावेश आहे.हे प्रकल्प वंचित गटांना सन्माननीय उपजीविका प्रदान करण्याच्या मिशनमधील एक मोठा मैलाचा दगड ठरतील. ट्रान्सजेंडर समुदायास यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी कौशल्याभिमुख अभ्यासक्रम देण्याचा या प्रकारचा भारतातीत हा प्रथम उपक्रम असेल.

डॉ. स्वाती मुजुमदार, प्रो-चांसलर सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने सर्वसमावेशक शिक्षणाच्या गरजेवर भर दिला आणि सांगितले की, भारतात प्रथमच एक स्किल युनिवर्सीटी ट्रान्सजेंडर समुदायासाठी विशेष प्रकारे डिझाइन केलेले प्रोग्रॅम घेऊन आली आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेली उत्पादने खरेदी करण्यासाठी उद्योगांचे सहकार्य घेऊन उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक अद्वितीय मॉडेल तयार केले आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही समाजासाठी काहीतरी करू शकलो आणि समाजाच्या सर्वसमावेशक वाढीसाठी योगदान दिले.

लक्ष्मी नारायण त्रिपाठी म्हणाल्या,असा विचारशील उपक्रम सुरू केल्याबद्दल मी सिंबायोसिस आणि ग्रॅव्हिटस फाउंडेशनची आभारी आहे. हे माझे कर्तव्य आहे की मी काहीतरी चांगले कार्य करण्यात मदत करू शकते जे आपल्या लोकांना मदत करेल. मी या प्रकल्पाच्या भव्य यशासाठी शुभेच्छा देतो. ”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading