fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsSports

एचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पुना क्लब, केडन्स क्रिकेट अकादमी संघांची विजयी सलामी

पुणे : हेमंत पाटील(एचपी) प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पुना क्लब व केडन्स क्रिकेट अकादमी या संघांनी अनुक्रमे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी व युनायटेड स्पोर्ट्स क्लब या संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पुना क्लब, लोहगाव येथील वीरांगना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात अकिब शेख(50धावायाने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुना क्लब संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 20षटकात 7बाद 136 धावा केल्या. यात किरण मोरे 31, मिझान सय्यद 26, सौरभ नलावडे 25, विनय पाटील 12, पवन शहा 11 यांनी धावा केल्या. पुना क्लबकडून शुभम कोठारी(3-25), धनराज परदेशी(2-23), विश्वराज शिंदे(1-25) यांनी सुरेख गोलंदाजी करत व्हेरॉक संघाला मोठे आव्हान उभारण्यापासून रोखले. याच्या उत्तरात पुना क्लब संघाने 18.2षटकात 2बाद 140धावा करून पूर्ण केले. सलामीचा फलंदाज यश नाहरने 17 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारासह 39 धावा काढून चांगली सुरुवात करून दिली. यशला अकिब शेखने 42 चेंडूत 7चौकारांसह 50 धावांची संयमी फलंदाजी करत सुरेख साथ दिली. अकिब शेख व अजिंक्य नाईक(नाबाद 44धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 82 चेंडूत 87 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर अकिब शेख ठरला.

दुसऱ्या सामन्यात हर्षद खडीवाले(63धावायाने केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाचा 23 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading