fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पीएमपी कडून अटल बस योजनेअंतर्गत कात्रज ते येवलेवाडी नवीन बसमार्ग सुरू

पुणे : पीएमपीएमएल कडून अटल बस योजनेअंतर्गत मार्ग क्रमांक के १६ कात्रज ते येवलेवाडी हा नवीन बसमार्ग दि. १८ सप्टेंबर २०२१ पासून सुरू करण्यात आला. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक मा. श्री. वसंत मोरे यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. श्री. समीर शिंदे यांच्या पाठपुराव्यातून ही बस सेवा सुरू झाली. सदरची बस सेवा अटल बस सेवेअंतर्गत असल्याने प्रवासी नागरिकांना फक्त पाच रुपये एवढ्या अत्यल्प व किफायतशीर दरात बस सेवा उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी नितीन कामठे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, कात्रज आगार व्यवस्थापक विजय रांजणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्ग क्रमांक के १६ कात्रज ते येवलेवाडी या बससेवेचा मार्ग कात्रज, राजस सोसायटी कॉर्नर, सुंदरबन, गोकुळ नगर, इस्कॉन मंदिर, मेट्रो ग्रीन सोसायटी, विभा कंपनी, आकृती सोसायटी, साई कृष्ण सोसायटी, शिक्षक कॉलनी कामठेनगर, अष्टविनायक कॉलनी, अंतरा सोसायटी, पानसरे नगर, बापूसाहेब शेलार नगर, मनपा शाळा येवलेवाडी, कामठे माध्यमिक विद्यालय, येवलेवाडी असा असणार आहे. सध्या ही बस सेवा दर १ तासाला उपलब्ध असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढवल्या जातील.
याप्रसंगी बोलताना नगरसेवक वसंत मोरे म्हणाले, “पीएमपीएमएलने कात्रज व येवलेवाडीला जोडणाऱ्या अंतर्गत मार्गावरून ही नवीन बससेवा फक्त पाच रुपये एवढ्या किफायतशीर तिकीट दरात सुरू केल्यामुळे या मार्गावरील नागरिकांची चांगली सोय होणार आहे.”
सदर चा नवीन बस मार्ग सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त करून पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading