fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsTECHNOLOGY

चिंगारी अॅपवर सार्वजनिक गणपतींचे दर्शन

मुंबई : गणेश चतुर्थीचा महत्त्वाचा उत्सव साजरा करण्यासाठी चिंगारी या भारतातील अग्रगण्य शॉर्ट व्हिडिओ अॅपने  एक अनोखा ऑनलाईन उपक्रम राबवला आहे. गणेश मंडळांमध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन घेण्यास उत्सुक भाविकांसाठी अँपवरच सर्व प्रमुख मंडळाच्या गणपतींचे दर्शनाची सोय चिंगारी ऍपने केली आहे. चिंगारीच्या यूझर्सना गणपती दर्शनासाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही, कारण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी देवच घरापर्यंत येत आहे.

गणेश चतुर्थी हा भारतात साजरा होणारा भव्य महोत्सव अतुलनीय असतो. कोरोनाच्या साथीमुळे उत्सवाचा आनंद कमी झाला असून प्रवासावरही निर्बंध आहेत. त्यामुळेच चिंगारी आपल्या युझर्सना घरी राहूनच आरामात या सर्व गोष्टींचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. यासाठी अॅपने मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांशी करार केला आहे.  याद्वारे लोकांना बाप्पाच आपल्या घरी येत असून आपल्याला आशीर्वाद देत आहेत, असा अनुभव चिंगारी अॅपद्वारे घेता येत आहे.

चिंगारी अॅपचे सह संस्थापक आणि सीईओ  सुमित घोष म्हणाले, ” यूझर्सना अधिक अर्थपूर्ण अनुभव मिळावा, यासाठी चिंगारीने नेहमीच प्रयत्न केले आहेत. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही आघाडीच्या गणेश मंडळांशी करार केला असून लोकांना या उत्सवाचा आनंद घरी राहूनच घेता येईल. या करारामुळे आमच्या सर्व यूझर्सना विविध मंडळाची सजावट, आरती, भजन एवढेच नव्हे तर घराबाहेर न पडता या उत्सवातील चैतन्यमय वातावरणाचा अनुभव घेता येईल.”

गणेश चतुर्थी हा सकारात्मक ऊर्जा आणि सत्कार्य करण्याचा उत्सव असतो. नकारात्मक शक्तींचा नाश आणि चांगल्या गोष्टींची सुरुवात या महोत्सवातून प्रतीत होते. महोत्सव साजरा करण्यासाठी उत्साही असलेल्या लोकांच्या मदतीकरीता चिंगारीने #ChingariBappa ही स्पर्धाही सुरु केली आहे. हे कँपेन लाइव्ह असून याअंतर्गत लोक या सणातील त्यांचे व्हिडिओ आणि संदेश शेअर करू शकतील. यात पात्र होणाऱ्या सर्व यूझर्सना चिंगारी कॉइन्स जिंकण्याची संधी मिळेल. यासोबतच स्पर्धेच्या विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत.आता पर्यंत या कॅम्पेनला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे, २०० करोड पेक्षा अधिक व्ह्यूज आणि क्रिएटर्सनी  १५ हजाराहून अधिक व्हिडीओज तयार केले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading