fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsSports

टेनिस व्हॉलीबॉल खेळाची आशियाई संघटना स्थापन करणार

पुणे :  भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघास भारतीय क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे. आता हा खेळ जागतिक स्तरावर अधिक खेळला जावा, यासाठी लवकर आशियाई टेनिस व्हॉलीबॉल संघटनेची स्थापना करण्यात येईल; तसेच राज्य संघटना विकासात्मक आणि आर्थिक दृष्टीने बळकट होण्याच्या दृष्टीने यापुढे काम करण्यात येईल, असा निर्धार भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघाच्या वतीने पुण्यात झालेल्या सभेत करण्यात आला. यावेळी २४ राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 सभेला टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड,  महासंघाचे अध्यक्ष आनंद खरे, महासंघाचे चेअरमन भगवान पेद्देवाड, महासंघाचे कोषाध्यक्ष धर्मवीरसिंह जडेजा, विकास समितीचे अध्यक्ष सुरेशरेड्डी, महासंघ महासचिव डॉ. रितेश वांगवाड,  राज्य कार्याध्यक्ष अनिल सोनवणे,  राज्य चेअरमन गणपतराव बालवडकर, राज्य महासचिव गणेश माळवे उपस्थित होते.
गुजरात, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मु काश्मीर,  गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नागालँड, ओरिसा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड आदी राज्यांचे राज्य सचिव उपस्थित होते.

डॉ. व्यंकटेश वांगवाड म्हणाले, टेनिस व्हॉलीबॉल महासंघास  भारतीय क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यक्रमाबाबत सभेत चर्चा करण्यात आली. आशियाई संघटनेची स्थापना करून टेनिस व्हॉलीबॉल हा खेळ जागतिक स्तरावर नेण्यात येईल, राज्य संघटना विकासात्मक, आर्थिक दृष्टीने बळकट होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, याचा सर्व फायदा खेळाडूंना मिळेल, यासाठी  प्रयत्नशील राहण्याचे आवाहन देखील त्यांनी या वेळी केले.
जे राज्य अकार्यक्षम आहेत त्या राज्याबदल पुढील कार्यवाही करून नवीन राज्य सचिव नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. प्रफुल्लकुमार बन्सोड, डॉ. दिनेश शिगारम, किशोर चौधरी, हेमंत वाघ यांनी बैठकीचे उत्कृष्ट नियोजन केले.


*शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाची रुपरेषा

सिनियर गट – ओडीसा, युथ / ज्युनिअर गट : कर्नाटक, – सब- ज्युनिअर/ मिनी गट: तामिळनाडू, या ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading