fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 215 नवीन कोरोनाचे रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून दोनशे च्या वर आज    रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 215नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 161रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 98हजार  882इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 87हजार 894इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 6रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 4तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8990जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1908रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 188रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 9420
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading