fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRA

मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटरच्या कुस्ती विभागासाठी भरती

नवी दिल्‍ली : मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर, कर्नाटकमधील बॉईज स्पोर्ट्स, कंपनीच्या कुस्ती, क्रीडा विभागात मुलांची भर्ती (म्हैसूर,कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेशातील) 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार

 

  1. मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर (कर्नाटक)च्या बॉईज स्पोर्ट्स  कंपनीतर्फे, जिल्हा पातळीवर क्रीडा कॅडेट्ससाठी प्रवेशिका मागवल्या जात आहेत.  यासाठीची प्रवेश प्रक्रिया 27 सप्टेंबर ते 31 सप्टेंबर दरम्यान या रेटीमेन्ट केंद्रांवर घेतली जाईल. मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटरच्या कुस्ती विभागासाठी ही निवड प्रक्रिया केली जाणार आहे.
  2. पात्रता निकष.
    1. वय. 1 Sep 2021 रोजी वय 08-14 या दरम्यान असावे. (एक सप्टेंबर 2007 ते 30 ऑगस्ट 2013 दरम्यान उमेदवाराचा जन्म झाला असल्यास).
    2. शिक्षण. किमान चौथी इयत्ता पास तसेच इंग्रजी आणि हिन्दी भाषांचे ज्ञान.
    3. शारीरिक तंदुरुस्ती: मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर मधील वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तसेच आर्मी स्पोर्ट्स मेडिसीन सेंटरच्या तज्ञामार्फतउमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
    4. उमेदवाराने आपले आधीचे पदक आणि कुस्तीस्पर्धेत मिळवलेल्या यशाचे प्रमाणपत्र जिल्हास्तरावर सादर करावे.
    5. उमेदवाराच्या शरीरावर कुठेही टेटू असल्यास त्याची निवड केली जाणार नाही.
    6. बीएससी भरतीसाठी ऊंची आणि वजनाचे निकष खालील तक्यात दिले आहेत:
Ser Discipline Age at entry level Age (Yrs) Height (Cms) Weight
(a) Wrestling 08-14 years 08 134 29
09 139 31
10 143 34
11 150 37
12 153 40
13 155 42
14 160 47

सूचना: या नियमात कुठलेही अपवाद स्वीकारले जाणार नाहीत. मात्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे प्रमाणपत्र किंवा पदक असलेल्या अत्यंत प्रवीण उमेदवारांसाठी वयाचा निकष जास्तीत जास्त 16 वर्षे, तसेच ऊंची आणि वयाचा निकष शिथिल केला जाऊ शकतो.

  1. उमेदवारांनी बीएससीच्या कार्यालयात खालील महत्वाची कागदपत्रे सादर करावी. निवड चाचणीच्या वेळी उमेदवारांकडे ही कागदपत्रे असायलाच हवीत.
    1. जन्मदाखल्याची मूळ प्रत.
    2. जात प्रमाणपत्राची मूळ प्रत.
    3. शिक्षण दाखला, गुणपत्रिकेची मूळ प्रत.
    4. सरपंच किंवा शाळेकडून मिळालेला चारित्र्याचा दाखला.
    5. निवासी/ अधिवास प्रमाणपत्राची मूळ प्रत, ( तहसीलदार/जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून जारी केलेली )
    6. दहा रंगीत छायाचित्रे
    7. जिल्हा तसेच त्यावरील पातळीवरच्या क्रीडा स्पर्धेतील सहभागाची मूळ प्रमाणपत्रे.
    8. आधार कार्डची मूळ प्रत.
  2. उमेदवार विद्यार्थ्यांना त्यांच्या येण्याजाण्याचा आणि निवासाचा खर्च स्वतः करावा लागेल.
  3. नोंदणीसाठीची वेळ आणि स्थळ.
    1. स्थळ –          मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव (कर्नाटक)
    2. तारीख     –           27 सप्टेंबर 2021.
    3. वेळ    –         सकाळी 0700 ते 1000 वाजेपर्यंत
  4. निवड. भारतीय क्रीडा प्राधिकरण- साई, क्रीडा वैद्यकीय केंद्र आणि बॉइज कंपनी या चाचण्या/ निवडप्रक्रिया पूर्ण करतील.
  5. जिल्हा/राज्य/राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विजयी झालेल्यांना निवडप्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल.
  6. निवडलेल्या उमेदवारांना इंग्रजी/हिन्दी माध्यमातून मोफत प्रशिक्षण दिले जाईल. त्याशिवाय, साईमार्फत त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईलच. शिवाय दहावी नंतरही त्यांना विशेष निवड चाचणी आणि प्रशिक्षणातून जावे लागेल.
  7. निवड झालेल्या मुलांना निवड झाल्याच्या तारखेपासून तीन ते सहा महिन्यांच्या आत मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर (कर्नाटक) मध्ये रुजू व्हावे लागेल.
  8. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवारांना मास्क आणि हातमोजे तसेच आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल सादर करावा लागेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading