fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsNATIONALTOP NEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले सर्वाधिक लोकप्रिय नेते

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर एप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात मोदींना ७० टक्के गुणांकन मिळाले आहे. दर आठवड्याला या सर्वेक्षणाचा डेटा अपडेट केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक जागतिक नेत्यांना मागे टाकत रेटिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. मोदींनी मागे सोडलेल्या नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील नेत्यांपैकी सर्वाधिक लोकप्रिय असून ते उत्तम काम करत आहेत. १३ देशांतील नेत्यांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेटिंग ७० टक्के आहे तर मोदींशिवाय फक्त दोन नेत्यांनाच ६० पेक्षा अधिक रेटिंग मिळाले आहे. यामध्ये ६४ रेटिंगसह मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेजे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर तर ६३ रेटिंग इटालियनचे पंतप्रधान मारिओ द्रागी यांचा नंबर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या सर्वेक्षणात रेटिंग ही ४८ आहे. तर जर्मनीच्या चॅन्सलेर अँजेला मर्केल या चौथ्या स्थानावर असून त्यांची अप्रूव्हल रेटिंग ५२ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रियतेच्या यादीत प्रथम स्थानावर असले तरी त्यांच्या लोकप्रियतेमध्ये घसरण झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेटिंग ८४ टक्के होती. कोरोनाच्या कालावधीत झालेल्या निष्काळजीपणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झाली असल्याचेही दिसून येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading