fbpx
Friday, April 19, 2024
BusinessLatest News

गुगलद्वारे हेल्थ टेक स्टार्टअप ‘केयरक्सपर्ट’ची निवड

मुंबई : रिलायन्स जिओ समर्थित, सास (SaaS) आधारित, क्लाउड-आधारित डिजिटल आरोग्यसेवा मंच केयरक्सपर्टची (KareXpert) गुगल एक्सीलरेटर प्रोग्रामसाठी निवड करण्यात आली. या मंचावर ५०+ प्री-इंटिग्रेटेड मॉड्यूल आहेत. ज्यामुळे रुग्णालयांना त्यांचे डिजिटल परिवर्तन सक्षम केले जाते.  केयरक्सपर्टची ओळख गुगलच्या सध्याच्या आणि भविष्यातील सर्व डिजिटल गरजांसाठी कोणत्याही आकाराच्या रुग्णालयांसाठी वन-स्टॉप शॉप स्वरूपात झाली आहे. केयरक्सपर्ट ७०० हून अधिक कंपन्यांमधून निवडलेल्या सर्वोत्तम १६ स्टार्टअप्सपैकी एक ठरला आहे.

केयरक्सपर्टचे क्लाउड-नेटिव्ह, एआय-रेडी आणि मोबाइल-फर्स्ट सोल्यूशन हे ५०+ मॉड्यूल हॉस्पिटल आणि रुग्णांच्या सर्व भागधारकांमध्ये वर्कफ्लो आणि इव्हेंट चालित आर्किटेक्चर वापरणारऱ्या या सर्व भागधारकांमध्ये हायपर-कोलॅबोरेशन आणि हायपर-कोऑर्डिनेशन सुलभ करते. परिणामी रुग्ण सेवा आणि रुग्णांना सुखद अनुभव मिळतो. स्वयंचलित प्रणालीमुळे या प्लॅटफॉर्मला कमीत कमी मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता भासते.

केयरक्सपर्टच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधी जैन म्हणाल्या, “रुग्णालयांसाठी त्यांचे या टोकापासून ते त्या टोकापर्यंतचे कामकाज डिजिटायझेशन करणे, ऑपरेटिंग कॉस्ट कमी करणे, महसूल वाढविणे आणि सिंगल डेटा लेकचा वापर करून रुग्णांचा अनुभव वाढविण्यासाठी आम्ही क्रमांक एकचा हेल्थटेक मंच म्हणून वेगाने उदयास आलो आहोत. रुग्णालयाचे खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट हॉस्पिटल’मध्ये रूपांतर झाले आहे. गुगल एक्सीलरेटर प्रोग्रामचा एक भाग बनल्याबद्दल आणि हेल्थकेअरसाठी गुगल एआय तंत्रज्ञानासह एकजिनसीपणा आपल्याबद्दल आम्ही हरकून गेलो आहोत.”

केयरक्सपर्टच्या ग्राहकांमध्ये टाटा स्टील ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, महिंद्रा ग्रुप सीएफएस, रिलायन्स ग्रुप सर एचएनएच, पारस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स अशा भारतातील काही सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल चेन्स आणि हेल्थकेअर क्लिनिकचा समावेश आहे. केयरक्सपर्ट प्लॅटफॉर्म मध्ये सध्या नर्सिंग होम्सपासून मोठ्या कॉर्पोरेट चेन्सपर्यंतचे ग्राहक आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading