पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 257 नवीन रुग्ण

 

पुणे: शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशे च्या   वर आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे आली आहे  . गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 257नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 163रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 94हजार  724 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 83हजार 506इतके रुग्ण बरे झाले आहेत.

पुण्यात गेल्या 24 तासात 25रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील15तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील10 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8907जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2311अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 206रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9685 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: