fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

आदित्य बिर्ला सन लाईफ इन्श्युरन्स तर्फे डीजीशिल्डच्या प्रीमियम दरांमध्ये १५ टक्क्यांची कपात  

पुणे : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड ची जीवन विमा उपकंपनी असणाऱ्या आदित्य बिर्ला सन लाईफ इन्श्युरन्सने एबीएसएलआय डीजीशिल्ड प्लॅनच्या प्रीमियम दरात १५% नी कपात करत असल्याचे जाहीर केले आणि त्यायोगे टर्म इन्श्युरन्स क्षेत्रातील ती सर्वाधिक सक्षम योजनांपैकी एक बनली आहे. या योजनेमुळे ग्राहकांच्या विशेष संरक्षण गरजा भागविल्या जाणार असून ग्राहकांना त्यांच्या विशिष्ट संरक्षण गरजांना साजेशी योजनाही तयार करून दिली जाते.

पारंपरिक टर्म प्लॅनपेक्षा वेगळी एबीएसएलआय डीजीशिल्ड प्लॅन योजना असून सर्व्हायव्हल बेनिफिट पर्यायामधून ग्राहकांना त्यांच्या वयाच्या ६० वर्षांपासून खात्रीशीर परतावा रक्कम मिळायला लागते. पुढे जाऊन पूर्व परिभाषित निवृत्ती वयात सम अश्युअर्ड कमी करण्याची लवचिकताही यामध्ये आहे. जोडीला ग्राहकांना त्यांच्या बाकी राहिलेल्या जबाबदाऱ्या आणि जीवन अवस्था यानुसार कव्हर ठरविण्याची मुभाही आहे.

एबीएसएलआय डीजीशिल्ड प्लॅन योजना जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात एखाद्याच्या विविधांगी संरक्षण गरजा भागविण्याची व्यापक लवचिकता पुरविते. संयुक्त जीवन विमा संरक्षण, गंभीर आजारापासूनचे संरक्षण तसेच ग्राहक आणि त्यांच्या प्रियजनांसाठी त्यांना हवी तशी विशिष्ट संरक्षण सुविधा यामधून हवा तो पर्याय ग्राहक निवडू शकतात.

आदित्य बिर्ला सन लाईफ इन्श्युरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कमलेश राव म्हणाले की  अपेक्षेपेक्षा महामारीचा प्रभाव दीर्घकाळ राहिला असून लोकांच्या व्यक्तिगत आर्थिक व्यवहारांवर ताण आला आहे. आमच्या उत्पादनांमध्ये कोणत्याही प्रकारे किंमत रचना ठरविण्याआधी आम्ही व्यवस्थितपणे महामारीच्या अनुभवाचे निरीक्षण करत आहोत. टर्म प्लॅनची मागणी वाढत असताना आम्ही जाणीवपूर्वक एबीएसएलआय डीजीशिल्ड प्लॅनच्या प्रीमियम मध्ये कपात जाहीर केली आहे. आमच्या ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या आर्थिक गरजा लक्षात घेऊनच त्याला साजेशी व्यक्तिगत टर्म प्लॅन योजना आम्ही सादर केली. स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी आर्थिक सुरक्षा पुरविताना या चांगल्या टर्म प्लॅनच्या कपात केलेल्या प्रीमियमचा फायदा ग्राहकांनी घ्यावा अशी विनंती आम्ही करत आहोत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading