fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

डिप्रेस्ड क्लास मिशन संस्थेत स्वातंत्र दिनानिमित्त समता, स्वतंत्र, बंधुतेचे घेतली शपथ

पुणे : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी उपेक्षित ,दलीत ,गरीब समाजासाठी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशन संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याचा 75 वा दिन समता , स्वातंत्र,बंधुतेची शपथ घेऊन साजरा करण्यात आला.यावेळी सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत देशासाठी आणि समाजासाठी सेवा करण्याचा निर्धारही करण्यात आला . यावेळी ध्वजारोहण करून ध्वजवंदन करण्यात आले.


कोट्यवधी देशभक्तांच्या त्याग, बलिदान, समर्पणातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखण्याचा, भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मुल्यांची जपणूक करण्याचा, देशाचा प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचार पुढे घेऊन जाण्याचा, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक, निरंतच चालत राहण्याचा आपण सर्वजण पुन्हा एकदा दृढनिश्चय करुया,’ असे आवाहन संस्थेचे विशाल शेवाळे यांनी केले.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशन ही संस्था गेली कित्येक वर्षापासून कार्य करीत आहे.नाना पेठ ,भवानी पेठ आणि पुणे शहरातील उपेक्षित ,दलीत ,कष्टकरी समाजातील मुलांना शिक्षणाचे कार्य ही संस्था करीत आहे . डी .सी . एम् . संस्थेचे अध्यक्ष डी. टी. रजपूत,  एम. डी.शेवाळे,,  शेवाळे मॅडम , खजिनदार , विशाल शेवाळे , काजल शेवाळे , मुलीच्या शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले, कॉलेजचे प्राचार्य पोटे , म्हस्के सर , मुलाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका भोसरेकर, प्राथमिक शाळेचे इभाडसर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थित संस्थेच्या प्रांगणात आज ७५वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading