fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता


पुणे: मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे असून, पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीत आहे. दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश लगतच्या उपसागरामध्ये ३.१ किलोमीटर ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात मंगळवारपर्यंत (ता. १७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात पावसाला सुरूवात होण्याचा अंदाज आहे. राज्यात पावसासाठी पोषक हवामान झाले असून, पावसाला सुरूवात झाली आहे. उद्या (ता.१६) कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जना विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


या जिल्ह्यांत आहे पावसाचा अंदाज
उद्यापासून (ता. १६) कोकणात बहुतांशी ठिकाणी, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर उर्वरीत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, पुणे, नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, राज्यात उन्हाचा वाढलेला चटका कायम असून, तापमानाचा पारा २६ ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला, नागपूर, चंद्रपूर येथे सर्वाधिक ३५.० अंश सेल्सिअस, वर्धा येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर, वर्धा, ब्रह्मपूरी येथे तापमानाचा पारा ३४ अंशांच्या पुढेच आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाला पावसाने हजेरी लावली आहे.


रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :
कोकण :
हर्णे, श्रीवर्धन, सुधागड पाली प्रत्येकी ९०, ठाणे, उल्हासनगर प्रत्येकी ६०,
मंडणगड, म्हसळा, मुरूड, पेण, पोलादपूर प्रत्येकी ५०, रत्नागिरी, रोहा, संगमेश्वर, देवरूख, उरण प्रत्येकी ४०, अंबरनाथ, भिवंडी, लांजा, पालघर, शहापूर, तलासरी, वैभववाडी प्रत्येकी ३०.
मध्य महाराष्ट्र :
महाबळेश्वर १००, गगणबावडा, लोणावळा प्रत्येकी ४०, चंदगड, पौड, सुरगाणा प्रत्येकी ३०, अक्रणी, इगतपुरी, राधानगरी, सांगली प्रत्येकी २०.
मराठवाडा :
भूम २०, शिरूर अनंतपाळ १०.
विदर्भ :
अर्जूनी मोरगाव, मोहाडी प्रत्येकी ३०, भंडारा २०, गोरेगाव, साकोली प्रत्येकी १०.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading