fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

गणेशोत्सवाचे साहित्य, पर्यावरणपूरक मूर्ती आता ऑनलाईन उपलब्ध

पुणेः श्रावण सुरू होताना आगामी गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती निश्चित करुन बुकींग करणाऱ्या उत्सवप्रेमी पुणेकरांच्या दिमतीला पर्यावरणपूरक गणेशमूर्तिची निवड , सजावट साहित्य ऑनलाईन उपलब्ध झाले आहे. ‘ उत्सव माझा ‘ चा संकेतस्थळाने यासंबंधीच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत.’ उत्सव माझा ‘ डॉट इन या संकेतस्थळाचे प्रमुख वैभव जोशी, अश्विनी जोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. रविवारी या संकेत स्थळाचे उदघाटन वैभव जोशी, अश्विनी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले .

पर्यावरण पुरक गणेशमुर्तिची ‘चिरंतन गणेश ‘ ही संकल्पनांची आकर्षक मालिकाच त्यांनी ऑनलाईन उपलब्ध केली आहे. २५ हून अधिक प्रकारच्या वैविध्यपूर्ण, मोहक गणेशमूर्ती मधून भक्तांना आपल्या घरच्या बाप्पाची निवड करता येणार आहे. मूर्तीबाबत भक्तांनी सुचवलेले सूचना, बदलही लक्षात घेण्यात आले आहेत.

मूर्तीची वैशिष्ठे

संपूर्ण सुपीक मातीपासून तयार केलेली मूर्ती असून त्यात वृक्षांच्या बिया आहेत.या मूर्तींची 24 तासात पूर्ण विसर्जन प्रक्रिया पूर्ण होते.मातीपासून केलेली असली तरी सुद्धा मजबूत मूर्ती असून 7 ते 18 इंच आकारापर्यंत पर्यंत मूर्ती उपलब्ध आहे .संपूर्ण पुणे शहरात मोफत घरपोच पोहोचविण्यात येणार आहे.’चिरंतन गणेश-पर्यावरणपूरक गणेशमूर्ती” – घरीच करा श्री गणेश विसर्जन, वृक्षरूपाने तो राहील चिरंतन ‘असा संदेश या उपक्रमाचा आहे.

भक्तांच्या दिमतीला ‘ उत्सव माझा

या संकेत स्थळावर सजावट व पूजा साहित्य पूढील आठवड्या पासून उपलब्ध करण्यात येणार आहे.

मूर्ति आणि पूजा साहित्य, सजावट साहित्याचे बुकिंग utsavmajha.in या वेबसाईट वर जाऊन करता येईल तसेच ९८२२६१४७९८ , 9766530729 या Whatsapp वर देखील संपर्क करता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading