fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या सतरा वर्षीय तरुणीची आत्महत्या

पुणे : नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या सतरा वर्षीय तरुणीने नांदेड सिटी येथील मधुवंती इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. श्रीया गुणेश पुरंदरे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, श्रीयाच्या वडिलांची हॉर्स रायडिंगची अ‍ॅकॅडमी आहे. लहानपणापासून श्रीया हॉर्स रायडिंगचं प्रशिक्षण घेत होती. राज्य व राष्ट्रीय पातळीवर तिने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. ती सध्या बारावीत शिकत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, नांदेड सिटीमध्ये मधुवंती इमारतीच्या अकराव्या मजल्यावर श्रीया राहत होती. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास गॅलरीत व्यायाम करणारे अभिजित देशमुख यांना जोरात खाली काही तरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी खाली पाहिले असता त्यांच्या मुलीच्या वर्गात शिकत असलेली श्रीया ही खाली पडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती हवेली पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली व  तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारांपूर्वीच श्रीयाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, हवेली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading