fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTLatest NewsSports

ऑलिम्पिकपदक विजेत्या वेटालिफ्टर मीराबाई चानूच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ( Tokyo Olympic) सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूची  (Mirabai Chanu) सध्या सगळीकडे चर्चा आहे. मीराबाई चानू ही ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे. अशा चर्चेतल्या व्यक्तिमत्वाची फिल्म इंडस्ट्रीला  भुरळ नाही पडली तरच नवल. सध्या बॉलीवूड मध्ये बायोपिक चा हंगाम जोरात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता या यादीत मीराबाई चानू या नावाची भर पडणार असल्याचे समजते.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार मीराबाई चानू यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात येणार आहे. मात्र विशेष गोष्ट म्हणजे हा मणिपुरी चित्रपट असेल. मीराचे आयुष्य मणिपुरी सिनेमाद्वारे सर्वांसमोर सादर केलं जाईल.

ऑलिम्पिक विजेता आणि इंफाळच्या सेउटी फिल्म्स प्रॉडक्शन यांच्यात शनिवारी मीराबाई चानूवर नोंगपोक काचिंग या गावातील तिच्या निवासस्थानी चित्रपट बनवण्यासाठी करार झाला आहे. म्हणजेच मीराबाई चानूनंही चित्रपट बनवण्याचं मान्य केलं आहे.

त्याच वेळी, अध्यक्ष  मनाओबी एमएमचे यांनी एक प्रकाशन जारी केलं आहे, मनाओबी एमएमने सांगितलं की हा चित्रपट इंग्रजी आणि विविध भारतीय भाषांमध्ये देखील ‘डब’ केला जाईल. एवढंच नाही तर त्यांनी म्हटलं आहे की, चित्रपटासाठी आम्ही मीराबाई चानूच्या भूमिकेला साजेशी मुलगी शोधत आहोत, ती मीरासारखी दिसते. हे शूटिंग सुरू होण्यास थोडा वेळ लागेल. आता देशवासियांना हा चित्रपट दाखवला जाईल, मीराबाई चानू यांनी दिवस -रात्र मेहनत करून आणि अडचणी बाजूला ठेवून देशासाठी पदक कसं जिंकलं आहे हे या चित्रपटात दाखवलं जाईल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading