fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

‘रॉ’ अधिकाऱ्यांचे कारनामे ‘पॅंथर’ या वेबसिरीजमध्ये

भारताची गुप्तचर संस्था असलेल्या ‘रॉ’ च्या अधिकाऱ्यांचे कारनामे आपल्याला ‘पॅंथर’ या वेबसिरीज मधून पाहायला मिळणार आहेत. रॉनी स्क्रूवाला यांनी या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. या वेबसिरीजच्या पहिल्याच भागात आपल्याला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विमान अपहरणाच्या कटाचा उलगडा होताना दिसणार आहे. याचा प्रत्येक एपिसोड हा पंचेचाळीस मिनिटांचा असणार असून यामध्ये दाखवण्यात येणारी सर्व गुप्त ऑपरेशन्स वास्तवात घडलेली आहेत. पुढील वर्षी या वेब सिरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शन रेन्सिल डिसिल्वा करणार आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. या पूर्वी रेन्सिल यांनी अनिल कपूरच्या ’24’च्या दोन्ही सिझनचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ‘कुर्बान’ आणि ‘उंगली’ हे चित्रपट त्यांनी यापूर्वी दिग्दर्शित केले आहेत. ‘अक्स’ आणि ‘रंग दे बसंती’ या चित्रपटासाठी लेखनही केले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading