fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक सोमवारी पुण्यात

पुणे :महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार सोमवार दि. १९ जुलै २०२१ रोजी पश्चिम महाराष्ट्र महिला काँग्रेसची आढावा बैठक सकाळी १०.०० वा., काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित केली आहे.

कोरोनाच्या काळात महिला काँग्रेसच्या बैठका आँनलाईन होत होत्या तसेच कोरोनाच्या काळात प्रदेश महिला अध्यक्षा श्रीमती. संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सर्व  जिल्हा, शहर, तालुका महिला अध्यक्षा आणि त्यांच्या सहकारी यांनी रस्त्यावर उतरून कामे केली. या  परीस्थितीमधील सर्व महिला  काँग्रेसचे काम, आंदोलने, मोर्चे, आगामी येणाऱ्या निवडणूक संबंधी तयारी, नियोजन, महिला काँग्रेसचे संघटन याबाबत पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्हा, शहर, तालुका महिला अध्यक्षा आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून बैठकीत आढाव घेणार आहेत. या बैठकीच्या कार्यक्रमात कोरोनासंबधी सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्रमधील जिल्हा आढावा बैठकीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे,

१) सकाळी १०.३० सोलापूर
२) सकाळी ११.३० सांगली
३) दुपारी १२.३० सातारा
४) दुपारी १.३० राखीव
५) दुपारी २.३० पिंपरी-चिंचवड
६) दुपारी ३.३० पुणे ग्रामीण
७) सायं. ४.३० राखीव
८) सायं. ५.०० पुणे शहर
९) सायं. ६.०० समारोप

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading