fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRA

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने समाजासाठी एक पाऊल पुढे टाकले -राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर : मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांना दिली फीमध्ये सवलत शिक्षण संस्थेने यावर्षी व्यावसायिका
समाजातील विद्याथ्र्यांना फी करण्याचा निर्णय सरकारने घ्यायला हवा होता; परंतु सरकार काहीच करीत. नाही. फक्त बैठका घेऊन आश्वासन देते. फीबाबत सरकार निर्णय घेत नसल्यानेच प्रवरा ग्रामीण ग्रामीण शिक्षण संस्थेने समाजासाठी एक पाऊल पुढे टाकले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले..

चालू वर्षीच्या शैक्षणिक वर्षांत ५० टक्के फी सवलत देण्याचा निर्णय प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने घेतल्याबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष शरदराव निमसे, जिल्हाध्यक्ष संतोष भागडे, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक दशरथ गव्हाणे, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय नेते सोमनाथ नवले, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी आमदार विखे पाटील यांचा शिवप्रतिमा देऊन सत्कार केला. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरषोत्तम खेडेकर यांनीही दूरध्वनीवर संवाद साधून आमदार विखे पाटील यांचे अभिनंदन केले.

आमदार विखे पाटील म्हणाले की, मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर समाजील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली. शैक्षणिक प्रवेशाचे तसेच नोकरीच्या नियुक्त्यांचेही प्रश्न निर्माण झाले असल्याने विद्याथ्र्यांबरोबरच पालकही चिंताग्रस्त बनले. आहेत. त्यातच कोविडच्या महामारीने अनेक कुटूबियांसमोर अर्थिक समस्मा निर्माण झाल्या असल्याने शैक्षणिक प्रवेशाचे प्रश्नचिन्ह उभे राहीले असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व सामाजिक परिस्थितीचा विचार करून मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थी आणि पालकांना दिलासा देण्यासाठी, सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतूनच प्रवरा ग्रामीण महाविद्यालयात प्रवेश विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार विखे पाटील यांनी सांगितले.

मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करून आमदार विखे पाटील यांचे अभिनंदन केले. राज्यातील इतरही संस्थांनी असे निर्णय घ्यावत, म्हणून निवेदन देणार असल्याचे मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

याप्रसंगी जयवंत मोरे, अजित मोरे, प्रविण कानवडे, ऋषिकेश मोरगे, बाळासाहेब निपुंगे, वैभव दिवटे, साहेबराव कुदळे, मच्छिंद्र नवले, संतोष विखे, हर्षल हिरवाळे, त्रिशूल पाटील, श्रीकांत शिंदे भगवतीकर, बाळू येईलवाड डॉ. अरविंद बडाख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading