fbpx
Friday, April 19, 2024
BusinessLatest News

कोल्ड चेनच्या विकासात पुण्याचा महत्वाचा वाटा :अरविंद सुरंगे

पुणे :जागतिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन भारतात कोल्डचेनचे नवे पर्व सुरु करणाऱ्या ए. सी. आर. प्रोजेक्ट कनसल्टंटस या भारतातील पहिलीच तांत्रिक सल्लागार कंपनी १६ जुलै रोजी सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे . देशात आणि जागतिक पातळीवर विकसित होत असलेल्या ‘कोल्ड चेन’या क्षेत्राच्या प्रगतीत,विकासात पुण्याचा महत्वाचा वाटा राहील असे मनोगत ए. सी. आर प्रोजेक्ट कनसल्टंटस चे संस्थापक अरविंद सुरंगे यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहे.

आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी या क्षेत्राच्या प्रगतीबाबत माहिती दिली.

ए. सी. आर. प्रोजेक्ट कन्सल्टंटस ने या व्यवसायाची स्थापना सन १९७१ मध्ये केली आणि आज सन २०२१ मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहेत.भारताच्या अन्न प्रक्रीया व कोल्ड चेन डेव्हलपमेंट क्षेत्रातील एक अग्रगण्य तांत्रिक सल्लागार असा या कंपनीचा लौकिक आहे.

या पन्नास वर्षाच्या काळात अन्नप्रक्रीया व कोल्डचेन डेव्हलपमेंट क्षेत्रात ए. सी. आर. पी.सी. ने ७०० पेक्षा अधिक प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. या मध्ये शासकीय, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रोजेक्ट आहेत. देशातील बहुतेक सर्व भागात त्याचे तंत्रज्ञान पोहोचलेले आहे. जागतिक पातळीवर २००८ साली पहिल्यांदाच हरित तंत्रज्ञानावर आधारित ग्रीन कोल्डचेन ही संकल्पना मांडुन तिचा प्रसार केला आहे. एसीआर पीसी प्रा. लि. साठी ही एक महत्वाची बाब आहे. कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल सुरंगे यांचे प्रयत्न या प्रगतीत महत्वपूर्ण ठरले

संपुर्ण फुड प्रोसेसिंग प्रणाली व कोल्ड चेन प्रणाली. फळे, भाजीपाला, मांस, मासे, अंडी व दुग्धजन्य उत्पादनांसाठी बहुउद्देशीय शीतगृह, वातावरण नियंत्रित शीतगृहे,संपूर्ण पॅकहाऊस प्रणाली, कापणी, तोडणी पश्चात संपूर्ण तंत्रज्ञान युक्त प्रणाली,प्रोसेसिंग, पोकलिंग व शीतगह प्रणाली सह,फळ पिकवण्यासाठीचा प्रणाली. फळे, भाजीपाला, मांस, मासे, अंडी व दुग्धजन्य उत्पादन यांसाठी लागणारी फ्रिजिंग,व २०° से. तापमानाची शीतगृह प्रणाली,आइस प्लांट व इंडस्ट्रीयल रेफ्रिजरेशन प्रणाली, फुड डीस्ट्रीब्युशन सेंटर फुड क्लस्टर प्रोजेक्ट, प्रकल्पासाठी लागणारे टेक्नो इकॉनॉमिक रिपोर्ट करणे यासाठी ही कंपनी काम करते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading