fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

Pune – दिलासादायक ! शहरात गेल्या चोवीस तासात 279 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे मागील काही दिवसापासून शहरात नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांची  संख्या कमी आहे  पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 189नवीन रुग्णांची नोंद झाले आहे तर 279 रुग्णांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4  लाख 80 हजार 150 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी 4लाख 82 हजार 023 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या चोवीस तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे यामध्ये शहरातील 9 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे आतापर्यंत पुणे शहरात 8656 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर   4802  स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत.

शहरांमध्ये सध्या 2991 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत त्यापैकी 225रुग्ण गंभीर आहेत तर आज पर्यंत 4 लाख 70 हजार 376रुग्णांना  डिस्चार्ज   दिला आहे अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading