fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

भारती विद्यापीठ आय एम ई डी मधील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन

पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )तर्फे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इमर्जिंग मार्केट्स ‘ विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आले. ८ ते १० जुलैदरम्यान या परिषदेचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया ,दक्षिण आफ्रिका ,दक्षिण कोरिया,कुवैत,रोम ,व्हेगन ,स्वीडन ,मलेशिया अशा एकूण १४ देशांचे प्रतिनिधी,शिक्षण तज्ज्ञ,संशोधक,विद्यार्थी या परिषदेत सहभागी होणार आहेत. भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी ) चे संचालक आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ सचिन वेर्णेकर हे या परिषदेचे अध्यक्षस्थानी असून डॉ श्याम शुक्ला आणि डॉ श्रद्धा वेर्णेकर या समन्वयक आहेत.

मार्केटिंग क्षेत्रातील नवसंकल्पना आणि नवनेतृत्व यावरील चर्चेवर परिषदेत भर देण्यात येणार आहे. नव्याने उदयास येणाऱ्या बाजारपेठेतील बिझनेस इकॉनॉमिक्स,टेक्निकल अस्पेक्ट्स,आंत्रप्रेनरशिप विषयक पैलूंवर चर्चा होत आहे . संशोधनपर निबंध ,केस स्टडीज या परिषदेत मांडल्या जात आहेत.पहिल्या दिवशी उन क्युन्ग ली ,उन कुंग हू ,डॉ सोनिया बिलोर ,डॉ बर्नाडो निसिलिटी, डॉ सोनाली खुर्जेकर ,डॉ श्रद्धा वेर्णेकर यांनी मार्गदर्शन केले.

डॉ स्वाती देसाई,डॉ बलजित कौर,डॉ सोनाली खुर्जेकर ,दीपक नवलगुंद ,डॉ रामचंद्र महाडिक,डॉ भारती जाधव,डॉ प्रमोद पवार,डॉ सचिन आयरेकर,डॉ रणप्रीत कौर यांनी संयोजन केले.१४ देशातून पाचशे हुन अधिक विद्यार्थी ,प्राध्यापक ,संशोधक उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी ,तसेच शंभरहून अधिक मार्गदर्शक या परिषदेत सहभागी झाले आहेत . ‘सध्याच्या काळात उदयास येणारी बाजारपेठ आणि उद्योग प्राधान्य देईल . अशा नवसंकल्पना शोधण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत ‘असे प्रतिपादन डॉ माणिकराव साळूंखे यांनी उदघाटनपर भाषणात केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading