fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पानशेत धरण फुटीच्या हीरक स्मरण दिना निमित येणार नवीन कादंबरी

पुणे: पानशेत प्रलय. या घटनेने पुणेकरांवर चांगलीच छाप सोडली. आपल्या मागील पिढीतील किंवा आजी आजोबांच्या जमान्यातील लोकांशी बोलताना ते प्रकर्षाने जाणवतं की त्या आठवणी अजूनही त्यांच्या मनात ताज्याच आहेत. या घटनेने अनेकांची घरच काय पण आयुष्य उध्वस्त झाली काही त्याच्यातून तरलेही. तर असा हा प्रलय का आला? मातीच हे धरण कसं आणि का फुटलं? हे असं घडेल याविषयीची पूर्वसूचना आधी मिळली होती का? ? तत्कालीन मुख्यमंत्री यशवंराव चव्हाण यांनी ही युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळली? पूरग्रस्तांचे पुनर्वसन कसे झाले? या आणि अशा अनेक गोष्टींचा मागोवा लेखिका आश्लेषा महाजन यांनी “१२ जुलै १९६१” या कादंबरीत घेतला आहे.

या कादंबरीचा प्रकाशन सोहळा १२ जुलै २०२१ रोजी पुण्यात सुपर्ण सभागृह अरण्येश्वर सहकार नगर १  येथे डॉ सतीश आळेकर आणि विजय कुवळेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. 12ते 2 या वेळेत संपन्न होणार होणार आहे अशी  माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत ईकिंग इनोव्हेकेशन च्या आनंद लिमये यांनी दिली या पत्रकार परिषदेला  वैभव जोशी ,आश्लेषा महाजन, आनंद लिमये ईकिंग इनोव्हेकेशन उपस्थित होते .

या शिवाय या विषयाची दस्तऐवजीकरण हावे म्हणून पानशेत 1961 कादंबरी हे फेसबुक पेज सुरु केले असून त्यावर माहिती संदर्भातल्या पूरग्रस्तांच्या सचित्र सत्यकथा शेअर केल्या जात आहेत जिज्ञासूंनी पेजला जरूर भेट द्यावी अन्य मंडळींना कार्यक्रम ऑनलाइन पाहण्यासाठी लींक मिळणे बाबत 9322232454 वर संपर्क साधावा अशी माहिती आश्लेषा महाजन यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading