fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे पुण्यात चक्काजाम आंदोलन शनिवारी; पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती

पुणे : ओबीसींचे आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले आहे. त्याविरोधात भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरत आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यभर आंदोलन होणार आहेत. पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी पुणे आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहरतर्फे कात्रज चौक येथे शनिवार, दिनांक २६ जून २०२१ रोजी सकाळी १० वाजता चक्काजाम आंदोलन होणार आहे. भाजपा च्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होईल, अशी माहिती भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहरचे अध्यक्ष योगेश पिंगळे यांनी दिली.

आंदोलनाला भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांसह खासदार, आमदार, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच पुणे शहरातील विविध ओबीसी संघटना व समाजबांधक देखील शासनाचा निषेध करण्याकरीता आंदोलनात सहभागी होणार आहेत.

योगेश पिंगळे म्हणाले, ओबीसी आरक्षणाकडे आघाडी शासनाचा कानाकोळा झाला आहे. त्यामुळे बहुजनांना ताकद देण्याचे काम ज्यांनी केले, ओबीसी आरक्षणाचा पाया ज्यांनी रचला त्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मदिनी (दि.२६ जून) आम्ही सामाजिक न्यायाची मागणी करीत आहोत. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. त्यामुळे सरकारचा धिक्कार करण्याकरीता आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ न देण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading