fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

Pune – धानोरीतील डीपी रोडचे सर्व पक्षीय नेत्यांकडून भूमीपुजन

पुणे ः पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 1 (कळस-धानोरी) मधील धानोरी जकातनाका ते न्याती ईविटा दरम्यानच्या डीपी रस्त्यावरील मार्थोफिलिक्स शाळेजवळील ब्रीजच्या कामाचे भूमीपुजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार सुनिल टिंगरे, स्थानिक नगरसेवक अनिल टिंगरे, नगरसेविका ऐश्वर्या जाधव, आशुतोष जाधव, संतोष खांदवे, राकेश म्हस्के यांसह परिसरातील सोसायटीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार सुनिल टिंगरे म्हणाले, की नागरिकांची विकासकामे करण्यास आम्ही कटिबंध आहोत. विकासकामे करताना कोणताही पक्षपात न करता सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा आम्ही सर्व जण प्रयत्न करीत असतो. तसेच यापुढील काळातही सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे करु.

स्थानिक नगरसेवक अनिल टिंगरे म्हणाले, की सदरचा डीपी रस्ता पुर्ण व्हावा यासाठी मागील अनेक वर्षे प्रयत्न करीत असून या रस्त्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आले आहे. येथील ब्रीजच्या कामासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तरतूद उपलब्ध करण्यात आली असून लवकरच याठिकाणच्या कामास सुरुवात होणार आहे. या ब्रीजचे काम पूर्ण झाल्यानंतर समांतर असणाऱ्या पोरवाल रोडवरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून परिसरातील सर्व सोसायटीधारक वाहतुकीच्या दृष्टीकोनातून मोकळा श्वास घेणार आहे.
सदर रस्त्याचे विकासकाम पुर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केल्याबद्दल माजी आमदार जगदीश मुळीक व आमदार सुनिल टिंगरे यांचे स्थानिक नगरसेवक अनिल टिंगरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading