fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

सोमवारपासून देशभरात मोफत लसीकरण; CoWIN Appवर नोंदणी करणे बंधनकारक नाही

नवी दिल्ली –  देशभरात उद्या २१ जूनपासून कोरोना लसीकरण मोफत होणार आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ जूनला घोषणा केली. लसीकरणाच्या या नव्या टप्प्यात १८ वर्षांवरील जास्त वय असलेल्या सर्व लोकांना निशुल्क लस दिली जाईल. याचा पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.

देशातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी देशभरात मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. देशात उद्यापासून १९ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व लोकांना लस दिली जाईल. आता राज्यांना लस निर्माता कंपनींकडून डोस खरेदी करावे लागणार नाहीत. केंद्र सरकार डोस खरेदीकरून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत देणार आहे.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे नाकेनऊ झाले आहे. पण यादरम्यान लसीकरण ब्रह्मास्त्रच्या रुपात आहे. जगभरात कोरोना लसीकरणाचे काम सुरू आहे. भारतात आतापर्यंत ३० लाख लोकांना रोज लस दिल्या जात आहेत. येणाऱ्या दिवसात अजून लसीकरणाचा वेग वाढवला जाणार आहे.

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून ते ३० एप्रिलपर्यंत केंद्र सरकारने लस निर्मात्या कंपन्यांकडून १०० टक्के डोस खरेदी करून राज्यांना मोफत दिले गेले होते. या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स व ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांना लस दिली गेली. यानंतर १ मेपासून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. यामध्ये केंद्राने ५० टक्के डोस खरेदी केल्या आणि उर्वरित राज्य आणि खासगी रुग्णालये यांनी थेट खरेदी केल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading