fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कोरोनाची हत्या

पुणे – कोरोना च्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले नियम तोडून पर्यटनाला गेलात तर आयसोलेशन मध्ये ठेवण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळी सांगितले. संध्याकाळी अजितदादा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यक्रमात त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोरोना नियमावली पायदळी तुडवत कोरोना विषाणूची हत्या केल्याची घटना घडली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रचंड मोठी गर्दी उसळलेली बघायला मिळाली. या गर्दीत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला. 

दरम्यान, आम्ही लोकांची गर्दी होईल म्हणून सकाळी 7 वाजतादेखील उड्डामपुलांचे उद्घाटन केलेली आहेत. अगदी तसंच सकाळी सातला उद्घाटन केलं असतं तर कार्यक्रमाला लोकं मर्यादित आली असती”, असा दावा अजित पवार यांनी केला
गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्ते नाराज झाले असते. लोकांमध्येही नाराजी दिसली असती. मी प्रशांतला सांगितलं होतं की अतिशय साधेपणाने, नियमांचं तंतोतंत पालन करुन आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही जनतेला आवाहन करतो की, आपण नियमांचं पालन करा आणि मलाच एका कार्यक्रमात बोलवलं जात आणि इतक्या अडचणीत टाकलं जातं की धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही. अशी माझी अवस्था झाली आहे. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो”, असं अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading