fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

आंबील ओढा येथील रहिवासांचे स्थलांतरन करू नये – डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे – शहरातील आंबील ओढा येथील झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिका, पुनर्वसन प्रकल्पातील स्थानिक नागरिक, विकासक आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्यात काही प्रमाणात पुनर्वसन प्रकल्पाची माहिती उपलब्ध नसल्याने प्रकल्पात आवश्यक प्रगती होताना दिसत नाही. यासंदर्भात तेथील स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना निवेदन दिले होते.

या अनुषंगाने डॉ.गोऱ्हे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा केली. याबैठकीत याबाबत आंबील ओढा झोपडपट्टी धारकांची सोसायटी निर्माण करावी तसेच पावसाळ्यात येथील रहिवासांचे स्थलांतर न करण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केली. त्याचबरोबर आंबील ओढा येथील नाला वळविण्यासाठी विरोध असल्याचे नोंद करून घेण्याची निर्देश देऊन प्रायमो संस्थेचा अहवालावर माहिती मांडण्याचे आदेश डॉ.गोऱ्हे यांनी देऊन रहिवाशांची कोर समिती स्थापन केली आहे. पुनर्वसनात वसाहतीबाहेरील बाहेरील व्यक्ती आढळयास संबंधित व्यक्ती आणि अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी.

यावेळी निवेदन देऊन पुढील मुद्यांवर अधिकाऱ्यांना सूचना देऊन योग्य कार्यवाही करण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिले आहे.
★ आंबील ओढ्याचा मार्ग बदलणार याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. नैसर्गिक ओढ्याचा मार्ग किंवा नाल्याच्या मार्ग बदलल्याने काही ठिकाणी मोठा विध्वंस झाल्याचे आपल्या समोर उदाहरणे आहेत. त्यामुळे ओढाचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत बदलू नये.
★ पर्यावरणाचा ऱ्हास करून अशा बेकायदेशीर पद्धतीने ओढ्याचा मार्ग बदलून किंवा नाला हटवून सदरील प्रकल्प लादण्यात येऊ नये. तेथील नागरिकांचे पुनर्वसन करून मागचा पुढील कार्यवाही करण्यात यावी. तसेच झोपडपट्ीवासियांच्या पात्रता यादीत अनेक त्रुटींवर दिसल्याने यादी व संमतापत्रे पारदर्शक पद्धतीनेच तपासण्याचा निर्णय . राजेंद्र निंबाळकर यांनी घेतला.
★ पुणे महानगरपालिका यांनी सदरील आंबली ओढा येथील झोपडपट्टीची जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना दिली आहे का..? याबाबत प्रश्न सदरील निवेदनात विचारून मशाल संस्थेने जो सर्व्हे केला होता त्याची प्रत उपलब्ध करून त्यातील सूचनांवर योग्य कार्यवाही करण्याची सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी केली.

यावेळी यासंदर्भात काम करणारे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, शहर संघटक राजेंद्र शिंदे, अनंत घरत, तानाजी लोकरे, काँग्रेसचे माजी नगरसेविक अभय छजेड, सुधीर काळे, राष्ट्रवादीचे विशाल ओहोळ, आरपीआय हणमंत फडके, किरण सोमवंशी, किशोर कांबळे, सागर ढावरे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading