चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य, सीएनजीचे मोफत वाटप

पुणे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अप्पर सुप्पर इंदिरानगर मधील २०० कचरा वेचक महिलांकरिता धान्य वाटप करण्यात आले. तसेच २०० रिक्षाचालकांना सी.एन. जी. गॅस मोफत वाटप करण्यात आला. पर्वती मतदार संघाचे मंडल अध्यक्ष जितेंद्र पोळेकर आणि नगरसेविका वर्षा भिमराव साठे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी रिक्षा आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष अंकुश नवले, संजय साष्टे, अविनाश कुलकर्णी, चंद्रकांत वाईकर यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमराव बबन साठे शहराध्यक्ष भाजपा अनु.जा मोर्चा पुणे शहर यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: