fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज

पुणे – नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (मॉन्सून) जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज दक्षिण अशिया कृषी हवामान फोरमचे सदस्य, कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावत राहण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व विभागात यंदा सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस पडणार असून, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहिल, डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले आहे.


डॉ. साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाजाच्या मॉडेलनुसार संबंधित ठिकाणचे गेल्या तीस वर्षांचे हवामान आणि कृषी विद्यापीठांच्या हवामान केंद्रांनी नोंदवलेली यंदाची हवामान घटक स्थिती विचारात घेण्यात आली आहे. सन २०२१ मधील मार्च, एपिल, मे या तीन महिन्यातील कमाल व किमान तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी घटकांच्या नोंदीवर आधारीत हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading