fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsNATIONALTOP NEWS

स्फुटनिक व्ही लशीच्या उत्पादनाला भारतात सुरुवात

नवी दिल्ली — रशियन बनावटीच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या उत्पादनाला भारतात सुरुवात झाली आहे. आरडीआयएफ आणि पॅनेशिआ बायोटेक या कंपनीच्या प्लँटमध्ये स्पुटनिक व्ही लशीचे उत्पादनाला सुरुवात झाली आहे. यामुळे भारतातील लसीकरण अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे. स्पुटनिक व्हीने दिलेल्या माहितीनुसार, पॅनेशिआ दरवर्षी १० कोटी डोस तयार करणार आहे. याबाबत स्पुटनिक व्हीने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

भारतात लसीचे उत्पादन झाल्यानंतर गुणवत्ता तपासण्यासाठी पहिली खेप रशियाला पाठवणार असल्याचे समोर आले आहे. रशियाची सॉवरन वेल्थ फंड, रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) या लशीसाठी फंडिंग करतात. महत्त्वाचे म्हणजे भारतातील पाच कंपन्यांशी यांनी लशीच्या उत्पादनासाठी करार केला आहे. भारतात आतापर्यंत स्पुटनिक व्हीचे २ लाख १० हजार डोस मिळाले आहेत. तर मेच्या अखेरपर्यंत ३० लाख डोस मिळतील. तसेच जूनपर्यंत यांची संख्या वाढवून ५० लाख डोसपर्यंत जाईल.

दरम्यान देशात स्पुटनिक व्ही लसीच्या एका डोसची किंमत जाहीर झाली आहे. स्पुटनिक व्ही लस देशात ९४८ रुपये + ५ टक्के जीएसटी असेल. याचा अर्थ ९४८ रुपयांव्यतिरिक्त ५ टक्के एका डोसवर जीएसटी लागणार आहे, ज्यामुळे प्रत्येकी एका डोसची किंमत ९९५ रुपये असेल.

सध्या भारतात दोन लसीचे डोस दिले जात आहे. सीरम इन्स्टिट्यूची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लसीचा डोस दिला जात आहे. आता देशवासियांसाठी तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे देशातील लसीकरण मोहीम अधिक वेगवान होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading