fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

पुणे – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन कॉंग्रेस भवन येथे करण्यात आले.

रक्तदान शिबीराचे उद्‌घाटन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड, कमल व्यवहारे संजय बालगुडे, नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश बागवे, रमेश अय्यर, चैतन्य पुरंदरे, आमिर शेख, विशाल मलके, भूषण रानभरे, शिलार रतनगीरी, मिलिंद गवंडी आदी उपस्थित होते.

सदर शिबिराला रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड तसेच के.ई.एम हॉस्पिटल रक्तपेढीचे किशोर धुमाळ यांचे सहकार्य लाभले. सुमारे ६० रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळी रेमडेसिविर इंजेक्शनच्या जाणवणाऱ्या तुटवड्याबाबत शहराध्यक्ष रमेश बागवे व अरविंद शिंदे यांनी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण अमित देशमुख व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क साधून पुणे शहरातील रेमडेसिविर इंजेक्शनबाबत योग्य ती व्यवस्था करावी अशी विनंती यावेळी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading