fbpx
Thursday, April 25, 2024
Business

गुढीपाडवा साजरा करा कल्याण ज्वेलर्सची महाराष्ट्रीय दागिन्यांची श्रेणी – “संकल्प”सह

मुंबई, दि. 9 – पारंपरिक नववर्षाची सुरुवात मानला जाणारा सण गुढीपाडवा महाराष्ट्र राज्यात सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यासाठी कल्याण ज्वेलर्सने संकल्प ही दागिन्यांची श्रेणी लाँच केली आहे. महाराष्ट्रीय वारशापासून प्रेरणा घेत बनवण्यात आलेली ही श्रेणी खऱ्या अर्थाने या सणाचा उत्साह प्रतिबिंबित करणारी असून त्यात विविध प्रकारच्या डिझाइन्सचा समावेश आहे.

संकल्प श्रेणीमधे पारंपरिक महाराष्ट्रीय दागिन्यांची डिझाइन्सबारीक कलाकुसर यांचा योग्य मेळ घालण्यात आला असून संपूर्ण श्रेणीवर महाराष्ट्रीय परंपरांचा ठसा उमटवण्यात आला आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कल्याण ज्वेलर्सने 100 कोटी रुपयांची बक्षिसे* देणार असल्याचे जाहीर केले असून त्याचबरोबर हिऱ्यांच्या दागिन्यांवर 25 टक्के, तर अनकट, प्रेशियस स्टोन्सच्या दागिन्यांवर 20 टक्के सवलत दिली जाणार आहे.

त्याशिवाय कल्याण ज्वेलर्सने सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर व्हीए किंवा घडणावळीवर 50 टक्क्यांपर्यंतची सवलत जाहीर केली आहे. कल्याण ज्वेलर्समधे जुन्या सोन्याच्या बदली योजनेमधे ग्राहकांना सोन्याचे जुने दागिने बदलताना शून्य टक्के कपातीसह सर्वाधिक मूल्य मिळेल. सणाची ही खास योजना महाराष्ट्रातील कल्याण ज्वेलर्सच्या सर्व दालनांमधे सुरू राहील.

सुरक्षित अंतर राखण्याचे नियम आणखी कडक होत असल्यामुळे कल्याण ज्वेलर्सने ‘लाइव्ह व्हिडिओ खरेदी सुविधा’ (https://www.kalyanjewellers.net/livevideoshopping/) सुरूकेली असून त्याद्वारे ग्राहकांना कल्याण ज्वेलर्समधील दागिन्यांच्या श्रेणी पाहाता येतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading