fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना- राज्यात रविवारी 40 हजार 414 रुग्णांची वाढ, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्याही 3 लाखांच्यावर

मुंबई – राज्यात आज तब्बल 40 हजार 414 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आजची आकडेवारी ही सर्वाधिक आकडेवारी आहे. कालपेक्षा तब्बल 5 हजारांनी रुग्ण संख्येत वाढ झाल्याने राज्यात लॉक डाउन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या 24 तासांत 17 हजार 874 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात सध्या 3 लाख 25 हजार 901 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २ टक्के इतका आहे. राज्यात आज १७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २३ लाख ३२ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९५ टक्क्यांवर आले आहे.

पुणे शहर

  • दिवसभरात 4426 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 2107 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 28 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
    259112
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-33123
  • एकूण मृत्यू – 5219
  • एकूण डिस्चार्ज- 220770

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading