fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

PMP ब्ल्यू रीज सोसायटी हिंजवडी ते पुणे मनपा भवन बससेवा सुरू

पुणे, दि. १० – पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक १०० ब्ल्यू रीज सोसायटी हिंजवडी ते पुणे मनपा भवन हि बससेवा सुरू करण्यात आली. पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार आणि नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर, उपसरपंच मनिषा हुलावळे,ग्रा.पं. सदस्य विक्रम साखरे, शिवानी जांभुळकर, संतोष साखरे,पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बससेवेचा मार्ग ब्ल्यू रीज सोसायटी हिंजवडी,महिंद्रा इंटरनॅशनल स्कूल,सिंबायोसिस कॉलेज, इन्फोसिस फेज १,हिंजवडी शिवाजी चौक,वाकड चौक,मानकर चौक,विशालनगर,औंध हॉस्पिटल, औंध गाव,ब्रेमन चौक,कस्तुरबा गांधी वसाहत,पुणे विद्यापीठ गेट,रेंज हिल्स कॉर्नर, शिवाजीनगर, मनपा भवन असा असणार आहे.
या बससेवेमुळे ज्येष्ठ नागरीक, दूर अंतरावरून हिंजवडीत कामासाठी येणाऱ्या महिला व विद्यार्थी यांना किफायतशीर दरात प्रवाशी सेवा मिळणार आहे.

यावेळी बोलताना शंकर पवार म्हणाले, पीएमपीएमएल कडून हि बससेवा सुरू करण्यात आल्याने खासगी वाहनांकडून भरमसाठ भाड्यापोटी होणारी प्रवाशांची लूट थांबणार आहे. प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळून उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढवण्यात येतील.
कार्यक्रमास माजी सरपंच शामराव हुलावळे, वसंत साखरे, अभिषेक जांभुळकर, ब्ल्यू रीज सोसायटी मधील ज्येष्ठ नागरीक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading