fbpx
Friday, April 19, 2024
Business

मोरपेन लॅब्सचे एपीआय बाजारपेठ काबीज करण्याचे लक्ष्य

पुणे, दि. १७ –  मोरपेन लॅबोरेटोरिज लिमिटेडने आता नव्या कोट्यवधी डाॅलर्सची ग्लोबल एपीआय (अॅक्टीव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रिडियन्ट्स) बाजारपेठ काबीज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीच्या बल्क ड्रग्ज पोर्टफोलियोमध्ये नव्या माॅलीक्युल्सची भर पडणार असून त्यामध्ये लाईफस्टाइलशी संबंधित आणि वारंवार उद्भवणाऱ्या आजारांशी संबंधित म्हणजे अँटी-डायबेटिक, अँटी-हायपरटेन्सिव्ह, कोलेस्ट्राॅल रिड्यूसर आणि न्यूरो-सायकियाट्रिक माॅलीक्युल्सचा समावेश आहे. या नव्या माॅलीक्युल्सची ग्लोबल पेटंटची मुदत पुढील पाच ते सहा वर्षात संपणार आहे. हे नवे माॅलीक्युल्स सध्या विकसित करण्यात येत असून पुढील २४ ते ३६ महिन्यात टप्प्या-टप्प्याने ते वापरात येतील. 

सुशील सुरी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, मोरपेन लॅबोरेटोरिज लिमिटेड यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतानाच्या बोर्ड मिटिंगनंतर ही माहिती जाहीर केली. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रात येऊ घातलेल्या नव्या उत्पादनांच्या मदतीने आपला पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यासाठी कंपनीने पावले उचलली आहेत. ही उत्पादने पुढील तीन ते चार वर्षात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लाँच केली जाणार आहेत. कंपनीने यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर संशोधनामध्ये गुंतवणूक केली आहे तसेच त्याच्या निर्मितीसाठीही अतिरिक्त उत्पादन व्यवस्था उभी केली आहे, असे त्यांनी सांगितले. 

केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर क्षेत्रात संशोधनासाठी आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता भरीव तरतूद केली आहे. आपल्या या बड्डी-स्थित एपीआय कंपनीने मागील व भविष्यातील उपक्रमांच्या एकिकृत कार्यक्रमाची आखणी केली असून त्याद्वारे सातत्याने वार्षिक विक्री आणि नफ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे, असेही सुरी यांनी म्हटले आहे.

मोरपेन लॅब्सला आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीत कर-पश्चात नफा २३.७९ कोटी रुपयांचा (१२० टक्क्यांची वाढ) नफा झाला आहे. डिसेंबर २०२० अखेरीस नऊ महिन्यांचे नेट प्राॅफिट ७०.३३ कोटी रुपये एवढे होते. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही २१२ टक्क्यांची वाढ होती. त्या ९ महिन्यातील प्रति शेअर कमाई (इपीएस) ही १.५६ रुपये होती जी मागील वर्षी फक्त ०.५० रुपये एवढीच होती. 

कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच १७८ रुपयांचा मेगा एक्सपान्शन प्लॅन मंजूर केला आहे. एक खिडकी योजनेंतर्गत हिमाचल प्रदेश राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली आहे. कंपनीच्या सध्याच्या ३००० एमटी प्रति वर्ष क्षमतेमध्ये २००० एमटी प्रति वर्ष एपीआय उत्पादन क्षमता वाढणार आहे. त्यामुळे ७०० लोकांसाठी नव्याने रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पासाठी राज्यस्तरीय मंजुरी समितीच्या अंतिम पर्यावरण मंजुरीची प्रतीक्षा कंपनी करीत आहे. 

वाढविण्यात येणाऱ्या क्षमतेमुळे नव्या ४० आणि सध्या अस्तित्वात असलेल्या बल्क ड्रग्जच्या निर्मितीला मदत होणार आहे. यामध्ये अँटी-डायबेटिक, अँटी-हायपरटेन्सिव्ह, अँटी-अॅलर्जिक, अँटी-अस्थमॅटिक, कोलेस्ट्राॅल रिड्यूसर, अँटी-व्हायरल, अँटी-कोअॅग्युलंट्स, अँटी-सायकोटिक आणि अँटी-डिप्रेसन्ट्स याचा समावेश आहे. या विस्तारित निर्मिती क्षमतेमधून पुढील तीन वर्षांमध्ये व्यावसायिक निर्मिती होणार आहे. या विस्तारित प्रकल्पासाठी अंतर्गत अॅक्रुअल्सद्वारे निधी उभारणी करण्याचा कंपनीचा मानस आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading